Adipurush: दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ (Adipurush)  या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हा चित्रपट 16 जूनला होणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. दोन दिवसांपूर्वी 'आदिपुरुष' चित्रपटाची संपूर्ण टीम तिरुपती येथे चित्रपटाच्या प्रीरिलीज इव्हेंटसाठी गेली होती. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा युनिव्हर्सिटी स्टेडियम येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रभास, क्रिती सेनन, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार यांनी हजेरी लावली होती. तसेच भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात क्रिती सेनन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत हे दर्शनासाठी गेले होते. सध्या क्रिती आणि ओम राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आता क्रिती आणि ओम राऊत हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 


क्रिती आणि आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत  हे तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या मंदिराच्या आवारातील क्रिती आणि ओम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिरातून बाहेर आल्यावर एकमेकांना निरोप देताना ओम राऊत आणि  क्रिती यांनी मिठी मारली आणि ओमने क्रितीला गालावर गुडबाय किस केलं. गुडबाय किस केल्यानंतर ओम हा क्रितीला 'गॉड ब्लेस यू 'असं म्हणाला.  


आंध्र प्रदेशमधील भाजपचे राज्य सचिव रमेश नायडू नागोथू यांनी एक ट्वीट शेअर करुन क्रिती आणि ओम राऊत यांच्या मंदिर परिसरातील व्हायरल व्हिडीओवर आक्षेप घेतला होता. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, "मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करणे आवश्यक आहे का? तिरुमलाच्या भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा प्रकारे चुंबन घेणे आणि मिठी मारणे हे जे अजिबात स्वीकारले जाऊ शकत नाही.'  रमेश नायडू नागोथू  यांनी हे ट्वीट नंतर डिलीट केले. काही मंदिरप्रमुख/ संतांकडूनही या गोष्टीचा निषेध होत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, 'आदिपुरुष'च्या टीमने या वादाबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.




आदिपुरुष या चित्रपटात  प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे.   'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Adipurush: 'तिरुपतीची शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जा...'; गुडबाय किसच्या वादादरम्यान क्रितीची पोस्ट