Karan Johar: अभिनेता इरफान खाननं (Irrfan Khan) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 29 एप्रिल 2020 रोजी इरफान खानचे निधन झाले. आजही इरफानचे चाहते त्याचे चित्रपट आवडीनं बघतात. दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि इरफाननं एकदाही एकत्र काम केलं नाही. त्याबाबत पत्रकार-लेखिका शुभ्रा गुप्ता यांच्या "इरफान: लाइफ इन मूव्हीज" या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत, करण जोहरने सांगितले की, 'इरफानला मी कधीही चित्रपट ऑफर करू शकलो नाही कारण, मी त्याला ऑफर करु शकेल अशा माझ्याकडे असणाऱ्या चित्रपटांपेक्षा त्याचा अभिनय अतिशय स्ट्राँग होता.'
पुढे करण म्हणाला, "इरफानचा अभिनय हा अतिशय स्ट्राँग होता. माझ्याकडे अशी पटकथा, असा चित्रपट नव्हता जो इरफानला त्याचा सुंदर अभिनय दाखवण्याची संधी देईल. म्हणूनच मी इरफानसोबत कधीच चित्रपट केला नाही कारण मला तो चित्रपट निर्माता व्हायचं नव्हतं ज्याने त्याला एक निकृष्ट मेन स्ट्रीम चित्रपट दिला. मला त्याच्या करिअरच्या सुंदर आलेखावरील डाग व्हायचे नव्हते."
'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान' आणि 'ए दिल हाल मुश्कील' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या करण जोहरनं पुढे सांगितलं की, 'इरफानचा मृत्यू हा चित्रपटसृष्टीचे झालेले मोठे नुकसान आहे.'
इरफानच्या मृत्यूनंतर जोहरकडे "पाच स्क्रिप्ट्स" आल्या ज्या करणला इरफानसाठी योग्य वाटत होत्या. याबाबत करणनं सांगितलं, 'इरफान खानच्या निधनानंतर माझ्याकडे पाच स्क्रिप्ट्स आल्या होत्या ज्या इरफान खानसाठी योग्य होत्या. मला ते भयंकर वाटलं. त्या स्क्रिप्ट्स आता माझ्याकडे का आल्या हे तुम्हाला माहिती आहे? कारण ते चित्रपट केवळ इरफानसाठी होते,”
करणनं इरफान आणि श्रीदेवी यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याची संधी न मिळाल्यानं खंत देखील व्यक्त केली.
लवकरच करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: