Adipurush : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननच्या (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. एकीकडे या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. ओपनिंग डे आणि ओपनिंग वीकेंडला या सिनेमाने सर्वाधिक कमाई केल्याचं समोर आलं आहे. आता प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा पाहावा यासाठी निर्मात्यांनी या सिनेमाच्या तिकीटाची किंमत कमी केली आहे.


'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Adipurush Box Office Collection)


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता होती. त्यामुळे अनेकांनी या सिनेमाचे तिकीटे अॅडव्हान्समध्ये बूक केले होते. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 86.75 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात ओपनिंग डेला 100 कोटींचा गल्ला जमवला होता.


'आदिपुरुष'ने दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 69.1 कोटी, चौथ्या दिवशी 16 कोटी, पाचव्या दिवशी 10.7 कोटी, सहाव्या दिवशी 7.25 कोटी, सातव्या कोटी 4.85 कोटी, आठव्या दिवशी 3.4 कोटी, नवव्या दिवशी 5.25 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या वीकेंडला अर्थात रिलीजच्या दहाव्या दिवशी या सिनेमाने सहा कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीत या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत 274.55 कोटींची कमाई केली आहे.



  • पहिला दिवस : 86.75 कोटी

  • दुसरा दिवस : 65.25 कोटी

  • तिसरा दिवस : 69.1 कोटी

  • चौथा दिवस : 16 कोटी

  • पाचवा दिवस : 10.7 कोटी

  • सहावा दिवस : 7.25 कोटी

  • सातवा दिवस : 4.85 कोटी

  • आठवा दिवस : 3.4 कोटी

  • नववा दिवस : 5.25 कोटी

  • दहावा दिवस : 6 कोटी

  • एकूण कमाई : 274.55 कोटी


'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमातील संवाद, वीएफएक्स अशा काही गोष्टींवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला 'आदिपुरुष'


'आदिपुरुष' या बहुचर्चित सिनेमा प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहेत. प्रभास रामाच्या तर कृती सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif Ali Khan) झळकला आहे. टी-सीरिजने या सिनेमाची निर्मिती केली असून मराठमोळ्या ओम राऊतने (Om Raut) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


'आदिपुरुष' सिनेमाच्या तिकीटाची किंमत फक्त 112 रुपये


'आदिपुरुष' सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी निर्मात्यांनी आता या सिनेमाचं तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांना फक्त 112 रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता प्रत्येक भारतीय आदिपुरुष पाहणार, असं म्हणत तिकीट दर कमी केल्याची घोषणा केली आहे. 






संबंधित बातम्या


Adipurush : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची वाटचाल 300 कोटींच्या दिशेने; जाणून घ्या आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...