Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) सिनेसृष्टीत 31 वर्ष पूर्ण झाली आहेत. 31 वर्षांआधी त्याने 'दीवाना' (Deewana) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याचा हा पहिलाच सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. 31 वर्ष पूर्ण झाल्याने त्याने आस्क एसआरके (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. या सेशनदरम्यान चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर उत्तरं देताना तो दिसून आला. 


आस्क एसआरके सेशनदरम्यान शाहरुखच्या एका चाहत्याने 'दीवाना' या सिनेमातील 'कोई न कोई चाहिए' गा गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि किंग खानला विचारलं की,"सर या कमाल एन्ट्रीबद्दल आता काय वाटतं तुम्हाला?". यावर उत्तर देत बादशाह म्हणाला की," हेलमेट घालायला हवं होतं". किंग खानच्या या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. तसेच तो एक जबाबदार नागरिक असल्याची झलक त्याने पुन्हा एकदा दाखवली आहे. 






शाहरुखच्या चाहत्यांनी व्यक्त केली जुळ्या मुलांचं नाव 'जवान' आणि 'पठाण' ठेवायची इच्छा


शाहरुखच्या एका चाहतीने ट्वीट केलं आहे की,"सर, मी जुळ्या मुलांची आई होणार आहे. कृपया मला शुभेच्छा द्या आणि माझ्या मुलांची नाव मी 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) ठेवणार आहे. या ट्वीटला उत्तर देत किंग खानने लिहिलं आहे,"शुभेच्छा.. पण बाळांची नावं आणखी काहीतरी छान ठेऊ शकता". 






शाहरुख खानने पैसा, किंमत आणि प्रसिद्धी यापैकी कशाची निवड केली आहे? 


शाहरुख खानच्या एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की, पैसा, प्रसिद्धी, आणि किंमत यापैकी तू कशाची निवड केली आहेस. यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,"आधी किंमत आणि मग बाकीचे दोन्ही".  शाहरुखची मजेशीर अंदाजातील ही उत्तरे चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. 






शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो नयनतारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. एटली कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच त्याचा 'डंकी' (Dunky) हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : 'भावा जेवलास का?', 'सिगरेट ओढतोस का?'; चाहत्यांच्या प्रश्नांना किंग खाननं दिली भन्नाट उत्तरं