Adan Canto passes away: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता एडन कॅन्टो (Adan Canto) याचं निधनं झालं आहे. एडन कॅन्टोच्या निधनानं हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एडननं वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, अपेंडिसियल कॅन्सरमुळे एडन कॅन्टोचा मृत्यू झाला. एडन कॅन्टोच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
'द क्लीनिंग लेडी' मुळे मिळाली लोकप्रियता
एडननं 'द क्लीनिंग लेडी' या ड्रामा सीरिजमध्ये काम केले. एडनने या अमेरिकन सीरिजमध्ये मुख्य भूमिका केली होती. तो या सीरिजमध्ये अरमान मोरालेसच्या भूमिकेत दिसला होता. एडन या सीरिजच्या दोन सीझनमध्ये देखील दिसला होता. पण तब्येतीच्या समस्येमुळे तो या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा भाग होऊ शकला नाही. 'द क्लीनिंग लेडी' या ड्रामा सीरिजमुळे एडनला लोकप्रियता मिळाली.
कॅन्सरशी झुंज अपयशी
एडन कॅन्टो हा गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाचा सामना करत होता. पण 8 जानेवारी रोजी त्यानं जगाचा निरोप घेतला.एडान कॅन्टो यांच्या पश्चात पत्नी स्टेफनी अॅन कॅन्टो आणि रोमन एल्डर आणि इव्ह जोसेफिन ही दोन मुले आहेत.
एडननं 'या' सीरिजमध्ये केलं काम
1981 मध्ये मेक्सिको येथे जन्मलेल्या आणि टेक्सासमध्ये वाढलेल्या एडनने वयाच्या 16 व्या वर्षी मेक्सिको सिटीमध्ये गायक आणि गिटार वादक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं जाहिराती आणि टीव्ही शोमध्ये देखील काम केलं. 2013 मधील फॉक्स ड्रामा सीरिज 'द फॉलोइंग' मध्ये काम करण्याची संधी एडनला मिळाली.
एडन कॅन्टोने 'डिझाइनेटेड सर्व्हायव्हर', 'मिक्सोलॉजी' आणि 'ब्लड अँड ऑइल' या सीरिजमध्ये काम केलं. तसेच नेटफ्लिक्सच्या 'नार्कोस' या सीरिजमध्ये देखील त्यानं महत्वाची भूमिका साकारली.
एडन कॅन्टोने डेसिग्नेटेड सर्व्हायव्हर सारख्या मालिकेतही काम केले, मिक्सोलॉजी आणि ब्लड अँड ऑइलमधील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
एडन कॅन्टोने 2014 मध्ये एका लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. 2020 मध्ये त्याने थिओ रॉसीचा एक चित्रपट दिग्दर्शित केला.
संबंधित बातम्या: