Online Fraud : ऑनलाईनद्वारे आर्थिक फसवणुकीची प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. आता 1 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेल्या अभिनेत्री सोनारिका भदोरिया (Sonarika Bhadoria ) हिने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून इशिका जैस्वाल हिची जाहिरात केली आहे. या जाहिरातीद्वारे तिनं इशिकाच्या पेजवर जाऊन पैशांची गुंतवणूक करा आणि खूप सारे पैसे कमवा, असं सांगितलं. हा एक मोठा आर्थिक घोटाळा असून याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी अभिनेत्री सोनारिका भदोरिया आणि इशिका जैस्वाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
शाहू नगर येथील 29 वर्षीय परमेश मैत्री याने भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली शाहू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परमेश यांचा मत आहे की, त्यांनी अभिनेत्री सोनारिका बदोरियाची ऍड पाहून हे इन्व्हेस्टमेंट केली होता पण मात्र त्यांची यात फसवणूक झाली आहे.
कोण आहे सोनालिका भदोरिया?
सोनारिका भदोरिया ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तेलुगु, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसते. देवों के देव...महादेव या मालिकेतील देवी पार्वती/आदी शक्तीच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. सोनारिकाने इन्स्टाग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगबाबतस्टेटस ठेवले होता. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोनारिका भदोरिया ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. अनेक नेटकरी तिच्या पोस्टवर लाइक आणि कमेंट करतात.
तक्रारदार परमेश मैत्री यांनी अभिनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या अभिनेत्रीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वापरण्यात आलेला होत का? तसेच इतर गोष्टी तपासात निष्पन्न होणार. मात्र ही अभिनेत्रीची जाहिरात पाहून किती जणांची फसवणूक झाली आहे? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कुठल्याही असं ऑनलाइन ट्रेडिंग किंवा सेलिब्रिटी ॲड पाहून पैशाचे व्यवहार करू नये.
इतर महत्वाच्या बातम्या: