Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. लवकरच समंथा ही राज आणि डीके दिग्दर्शित 'सिटाडेल' (Citadel) या वेब सीरिजच्या इंडियन व्हर्जनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'सिटाडेल'या सीरिजच्या इंडियन व्हर्जनमध्ये अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सीरिजसाठी समंथाने तिची फी वाढवली आहे, असं सध्या म्हटलं जात आहे.
'द फॅमिली मॅन 2' (The Family Man - Season 2) सीरिजमधील सामंथाच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केलं आहे. आता समंथाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'सिटाडेल' या सीरिजसाठी समंथानं तिचं मानधन वाढलं आहे, असं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टनुसार, समंथाने तिच्या आगामी 'सिटाडेल' या सीरिजसाठी तब्बल 10 कोटी रुपये मानधन घेणार आहे.
अभिनेता प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेता रिचर्ड मॅडन अॅक्शन थ्रिलर 'सिटाडेल' (Citadel) या सीरिजच काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये भव्य प्रीमियर झाला.या प्रीमियरला या वेब सीरिजच्या इंडियन व्हर्जनच्या टीमने देखील उपस्थिती लावली होती. 'सिटाडेल'च्या इंडियन व्हर्जनमध्ये अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हे देखील हजेरी लावणार आहेत.
समंथाचे आगामी प्रोजोक्ट्स
सध्या सिटाडेल वेब सीरिजबरोबरच सामंथा विजय देवरकोंडासोबत (Vijay Deverakonda) कुशी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेकदा त्याचे विजयसोबतचे मौजमजेचे फोटो व्हायरल होतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
समंथा (Citadel) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. त्यानंतर काही वर्षांनी ते विभक्त झाले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: