Samantha Ruth Prabhu Report Card: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. समंथाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. सध्या तिचे दहावीचे रिपोर्ट कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. समंथा ही एक हुशार विद्यार्थिनी होती, हे तिचे दहावीचे रिपोर्ड कार्ड पाहिल्यानंतर कळते. 


सामंथाच्या या व्हायरल रिपोर्ट कार्डमध्ये दिसत आहे की, तिला सर्व विषयात 80 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, तिला गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. इतर  विषयांत तिला 80 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. एका ट्विटर अकाऊंटवरुन समंथाचं हे रिपोर्ट कार्ड शेअर करण्यात आलं आहे. या रिपोर्ट कार्डचा फोटो रिट्वीट करुन समंथानं लिहिलं, 'हा हा हे पुन्हा एकदा पाहिलं.' समंथाचं हे रिपोर्ट कार्ड पाहून चाहत्यांनी 'ब्यूटी विथ ब्रेन' अशी complement समंथाला दिली आहे. 


पाहा समंथाचं रिपोर्ट कार्ड






समंथाचे चित्रपट 


काही दिवसांपूर्वी सामंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेकांनी  कौतुक केले आहे.  समंथाच्या 1 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या  'कुशी' या चित्रपटाचीही चाहते वाट पाहत आहेत. समंथा ही सध्या वरुण धवनसोबत 'सिटाडेल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  'सिटाडेल' या सीरिजच्या इंडियन व्हर्जनमध्ये समंथा (Samantha Ruth Prabhu) आणि वरुण धवन (Varun Dhawan) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी  प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन यांच्या 'सिटाडेल' या सीरिजचा ग्रँड प्रीमियर लंडनमध्ये पार पडला.'सिटाडेल' या सीरिजच्या प्रीमियरला समंथा आणि वरुण यांनी हजेरी लावली. समंथाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






समंथा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली.  त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. त्यानंतर काही वर्षांनी ते विभक्त झाले. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Samantha : अभिनेत्री समंथाला जडला मायोसिटिस हा दुर्मिळ आजार, फोटो शेअर करत दिली माहिती