Rakhi Sawant Brother Rakesh Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. दिवसेंदिवस तिच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. नुकतेच तिच्या आईचे निधन झाले आहे. आता तिने तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) फसवणुकीचा आरोप केला आहे. तसेच आदिलनेदेखील राखी सावंतवर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान याप्रकरणावर आता राखीचा भाऊ राकेश सावंतने (Rakesh Sawant) मौन सोडलं आहे. आईचे निधन झाले त्यादिवशी आदिलने राखीला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर राखीच्या शरीरावर व्रण देखील उमटल्याचे, राकेश म्हणाला. 


राखी सावंतच्या भावाने काय आरोप केले आहेत? (Rakhi Sawant Brother Allegation) 


राकेश सावंतनेदेखील आदिल खान दुर्राणीवर गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतच्या भावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडोमध्ये राकेशने आदिल खान राखीला कसा मारहाण करायचा याबद्दल सांगितले आहे. तो म्हणत आहे,"ज्यादिवशी आमच्या आईचे निधन झाले त्यादिवशीदेखील आदिलने राखीला खूप मारहाण केली". 


राकेश सावंत पुढे म्हणतोय,"आदिल खानला आम्ही वेळोवेळी समजावत होतो. पण तरीही त्याने गैरवर्तन करणं सुरुच ठेवलं. आम्ही राखीचं मेडिकल चेकअप केलं असून तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण उमटले आहेत. शरीरावर मारहाणीमुळे काळे डाग पडले आहेत. आदिलने राखीवर पहिल्यांदा हात उचचला त्याचवेळी मी त्याला खूप सुनावलं होतं. आदिल राखीच्या पैशांचा वापर करत असे. राखीच्या पैशांचा वापर करत त्याने दुबईत घर घेतलं आहे". 




राकेश म्हणाला,"मला ज्यावेळी कळलं आदिल राखीच्या पैशांचा वापर करतो. त्याचवेळी मी त्याला सांगितलं होतं, तुला जे काही हवं असेल ते तू तुझ्या पैशांनी घे. तू राखीचा पती असलास तरी तू तिच्या पैशांचा गैरवापर करू शकत नाहीस". 


आदिल खान दुर्रानी पोलिसांच्या ताब्यात (Adil Khan Durrani Arrested)


राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. तिने तिच्या पतीचे म्हणजेच आदिल खान दुर्रानीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आदिल खान दुर्रानीला ताब्यात घेतलं आहे. तसेच राखीने तिच्या आईच्या मृत्यूलाही आदिल जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant-Adil Khan Durrani : राखीचा पती आदिल दुर्रानीला पोलिसांनी केली अटक