मुंबई : अभिनय किंवा चित्रपटांपेक्षा आपल्या फिटनेससाठी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचे पती राज कौशल यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं आहे. या दाम्पत्याने मुलीला 28 जुलै 2020 रोजी दत्तक घेतलं होतं पण तिचे फोटो आणि याबाबतची माहिती दसऱ्याच्या मुहूर्तावर शेअर केली. मंदिरा आणि राज यांना बऱ्याच काळापासून मुलगी दत्तक घ्यायची होती, ही प्रक्रिया या वर्षी पूर्ण झाली आहे.


मंदिरा आणि राज यांनी आपल्या मुलीचं नाव तारा बेदी कौशल असं ठेवलं आहे. मंदिरा बेदीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबत मंदिराने फॅमिली फोटो देखील शेअर केला आहे. फोटोमध्ये तिचे पती राज, मुलगा वीर आणि मुलगी तारा दिसत आहे.


मंदिराने आपल्या मुलीची ओळख करुन देताना लिहिलं आहे की, "तारा आमच्यासाठी प्रार्थना बनून आली आहे. आमची चिमुकली तारा. वीरने मोठ्या मनाने आणि प्रेमाने आपल्या बहिणीचं स्वागत केलं. मला अतिशय आनंद आहे की तारा 28 जुले 2020 आमच्या कुटुंबाचा भाग बनली."





त्याचवेळी मंदिराचे पतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की," दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही आमच्या घरातील नवीन सदस्य तारा बेदी कौशलची ओळख करुन देतो. अखेर आमचं कुटुंब पूर्ण झालं. हम दो हमारे दो"





या आनंदाच्या बातमीनंतर चाहते तसंच बॉलिवूड सेलिब्रिटीं या दाम्पत्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत.


मंदिरा बेदीने शांती या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर ती शाहरुख आणि काजोल यांच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये झळकली होती. तर साहो चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.


तर मंदिरा बेदीचे पती राज कौशल दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. फेब्रुवारी 1999 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. तर 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीरचा जन्म झाला होता.