Aatmapamphlet Marathi Movie आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाची सध्या चर्चा होता आहे. या चित्रपटाचं अनेक मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे.  आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाच्या नावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी  आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी एबीपी माझाला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचे नाव, या चित्रपटाची गोष्ट या सर्व गोष्टींबाबत चर्चा केली. 


आत्मपॅम्फ्लेट चित्रपटाच्या नावाबद्दल परेश मोकाशी म्हणाले, "आत्मचरित्र हे नाव एका जाडजूड ग्रंथाला दिलेलं असतं. आजपर्यंत आपण ज्याकाही बायोपिक्स पाहिल्या किंवा चरित्र वाचले ते थोर-मोठ्या माणसांवर आधारित होते. तुम्हा-आम्हा सारख्या साध्या माणसांचे सुद्धा बायोपिक असू शकते का? तर त्याचं उत्तर म्हणजे,असू शकतं. कारण ती फक्त आपली गोष्ट नसते. आपल्या अजूबाजूला जे घडत असतं त्याची देखील गोष्ट असते. म्हणून प्रत्येकाचं "आत्मपॅम्फ्लेट" असते. तसं आम्ही आमचं आत्मपॅम्फ्लेट घेऊन आलो आहोत."


आत्मपॅम्फ्लेट चित्रपटाच्या गोष्टीबद्दल परेश मोकाशी म्हणाले, "आशिषच्या चित्रपटासाठी मला लिखाण करायचं होतं. आशिष आणि मी नेहमी गप्पा मारत होतो. त्याच्या बालपणाच्या अनेक गंमतीदार गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. त्याचा चित्रपट होऊ शकतो का? असा विचार आम्ही केला."


'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाबाबत आशिष अविनाश बेंडे यानं सांगितलं, "ही फक्त लव्ह स्टोरी नाहीये. लव्ह स्टोरी हा फक्त खांदा आहे, या खांद्यावरुन आम्ही बऱ्याच गोळ्या चावल्या आहेत, असं म्हणता येईल. 90 चा काळ आम्हाला उभा करायचा होता. त्या काळातील नॉस्टॅलजिक गोष्टी तुम्हाला या चित्रपटात दिसतील." 


पाहा संपूर्ण मुलाखत



ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांनी आत्मपॅम्फलेट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. सई ताम्हणकर, सुबोध भावे, ललित प्रभाकर या मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आत्मपॅम्फलेट या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. आत्मपॅम्फलेट हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 


सुबोध भावेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "काल आम्ही सहकुटुंब आत्मपॅम्फलेट हा एक नितांत सुंदर चित्रपट पाहिला. आत्ताच्या काळात या चित्रपटाची किती गरज होती हे वारंवार बघताना जाणवत होतं. कृपया चुकवू नका आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पहा! भावांनो अफाट काम आहेत तुम्ही सगळ्यांनी"






संबंधित बातम्या:


Aatmapamphlet Official Teaser: वाळवीनंतर परेश मोकाशीचा 'आत्मपॅम्फ्लेट' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; भन्नाट टीझर रिलीज