मुंबई : 'राबता'फेम अभिनेत्री क्रिती सॅननला मॉडेल भैरवी गोस्वामीच्या अत्यंत असभ्य टीकेचा सामना करावा लागला. 'मुबारकां' चित्रपटातील 'हवा-हवा' हे गाणं पाहिल्यानंतर भैरवीने क्रितीच्या देहयष्टीवर हीन शब्दात टीका केली होती. त्यावर क्रितीनेही 'कोण भैरवी गोस्वामी?' असं म्हणत उत्तर दिलं आहे.
'ही अत्यंत वेडगळ बाई दिसत्ये... कशी काय अभिनेत्री झाली? ना हेडलाईट ना बम्पर. कॉलेजमधल्या पोरी पण बऱ्या दिसतात' अशी टीका भैरवी गोस्वामीने केली होती. भैरवी गोस्वामी हेट स्टोरी, भेजा फ्राय या चित्रपटात दिसली होती.
https://twitter.com/bhairavigoswami/status/888815919857905664
अभिनेता कमाल आर खानने क्रितीवर केलेल्या ट्वीटला कोट करुन भैरवीने ही कमेंट केली. 'ये देखो किरती बेचारी. राबता के फ्लॉप होने के बाद मेंटली डिस्टर्ब हो गई' असं ट्वीट केआरकेने केलं होतं.
https://twitter.com/kamaalrkhan/status/888714157478096896
भैरवीच्या कमेंटविषयी विचारल्यावर क्रितीनेही 'कोण भैरवी गोस्वामी?' असं उत्तर देत आपण या टीकांकडे लक्ष देत नसल्याचं सुचवलं. 'तिला पुरेशी प्रसिद्धी मिळालेली दिसतेय.. या टीकेच्या निमित्ताने सगळ्यांना तिचं नाव समजलं' असं क्रिती म्हणाली.
टायगर श्रॉफसोबत हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री क्रिती सॅनन दिलवाले, राबता आणि आगामी 'बरेली की बर्फी'मध्ये झळकणार आहे.