मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर असताना राज्य सरकार मात्र त्यांच्याविरूद्ध बोलणार्‍या लोकांना त्रास देण्यात व्यस्त असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार विरुद्ध कंगना असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विशेषाधिकार उल्लंघनाबद्दल महाराष्ट्र विधानसभेने 60 पानी पत्र पाठवलं आहे. या संदर्भात कंगनाने गोस्वामी यांचं समर्थन करत हे ट्वीट केलं आहे.


अभिनेत्री कंगना रनौत हिने ट्वीटमध्ये लिहलंय, की "कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना फॅसिस्ट राज्य सरकार मात्र त्यांच्याविरूद्ध बोलणार्‍या लोकांना त्रास देण्यात व्यस्त आहे, आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट पाहिजे आहे, #फासिझम थांबवा"




अभिनेत्री कंगना आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात ट्वीटर वार
आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत, मग बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन आणि आता खासदार जया बच्चन यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगना रनौतवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता संतापलेल्या कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना चक्क 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटलं. टाईम्‍स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हे वक्तव्य केलं. यावर "संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है," असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली.


एका इंग्रजी चॅनलबरोबर चर्चा करताना कंगना रनौत म्हणाली की, "उर्मिला मातोंडकर यांचा एक आक्षेपार्ह इंटरव्‍ह्यू पाहिला. ज्याप्रकारे त्या माझ्याबद्दल बोलत आहेत, ते पूर्णत: डिवचण्यासारखं आहे. त्यांनी माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली. मला भाजपकडून तिकीट हवंय, असं वाटत असल्याने त्या माझ्यावर हल्ला करत आहेत. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. हे जरा उर्मटपणाचं आहे, पण त्या नक्कीच त्यांच्या अभिनयासाठी ओळखली जात नव्हत्या. त्या कशासाठी ओळखल्या जायच्या, सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकीट मिळू शकतं. प्रत्येकाला तिकीट मिळू शकतं."


महत्वाच्या बातम्या : 


'Legend' म्हणत उर्मिलाला पूजा भट्टचा पाठिंबा 


हिरोबरोबर शैय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो, कंगनाचं वादग्रस्त ट्वीट 


'जस्टिस फॉर सुशांत'पासून 'जस्टिस फॉर कंगना'पर्यंत कसे आलो? उर्मिला मातोंडकरांचा सवाल


#UrmilaMatondkar वाचाळवीर कंगनाची भाषा कधी सुधारणार? कंगनाच्या टीकेला उर्मिलाची संयत प्रतिक्रिया