Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station Andheri) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांकडून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. तसेच सय्यद यांची दुबई, लंडनमध्ये मालमत्ता आहे, असा आरोप शिंदे यांनी केला होता. सय्यद यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज शिंदे 2019 पर्यंत पाहत होते. पण सय्यद यांनी शिंदे यांना 2019 मध्ये कामावरुन काढले होते. आता याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत. 


भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी याआधीदेखील दिपाली सय्यद यांचं पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता दिपाली सय्यद यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.


दिपाली सय्यद म्हणाल्या... 


दिपाली सय्यद म्हणाल्या,"माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर जे आरोप झाले ते अत्यंत चुकीचे आहेत. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना मी माझ्या नावावर लोकांकडून पैसे घेताना पकडलं आहे". 


भाऊसाहेब शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी 


अहमदनगर (Ahmednagar) येथे आज भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही असं भाऊसाहेब शिंदे यांचं म्हणणं आहे. दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.


वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या दिपाली सय्यद


दिपाली सय्यद यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. तसेच त्या राजकारणात देखील सक्रिय असतात. काळशेकर आहे का?,घुंगराच्या नादात, जाऊ तिथे खाऊ,मुंबईचा डबेवाला, होऊन जाऊ दे यांसारख्या चित्रपटांमध्ये दीपाली यांनी काम केलं आहे. दिपाली सय्यद अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. 


संबंधित बातम्या


Bhausaheb shinde: दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध, भाऊसाहेब शिंदेंचा दावा