मुंबई : चित्रपट 'ओम शांति ओम'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये आपली 13 वर्ष पूर्ण केली आहेत. दरम्यान, 9 नोव्हेंबर 2007 रोजी शाहरुख खानसोबत बॉलिवूडमधील दीपिकाचा पहिला वहिला चित्रपट रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर दीपिकाने एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. आता तो बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.


दीपिका पादुकोण पुन्हा एका चर्चेत आली आहे. यशराज फिल्म्स निर्मीत चित्रपट 'पठाण' संदर्भात चर्चा सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.





चित्रपट 'ओम शांति ओम'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये आपली 13 वर्ष पूर्ण करत आहे. 9 नोव्हेंबर 2007 ला शाहरुख खानसोबतचा तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. त्यानंतर दीपिकाने एकापाठोपाठ एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आता ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनली आहे.


सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनात बनणारा चित्रपट एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असणार आहे. असं सांगण्यात येत आहे की, हा चित्रपट आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक बजट असणारा चित्रपट असणार आहे. अशातच आता दीपिकाने या चित्रपटासाठी घेतलेल्या फीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने 'पठाण'साठी जवळपास 14-15 कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटाची शुटिंग पुढच्या वर्षी सुरु होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'पठाण' तयार करण्यासाठी जवळपास 200 कोटी रुपयांचं बजेट तयार करण्यात आलं आहे. हा बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वात महागडा अॅक्शनपट असल्याचं बोलंल जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :