Entertainment Kissa : अभिनेत्री सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांची जोडी मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरली. मैने प्यार किया चित्रपटातून भाग्यश्री आणि सलमानला प्रसिद्धी मिळाली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या चित्रपटादरम्यान, घडलेले अनेक किस्से कधी सलमान, तर कधी भाग्यश्री सांगते. आता भाग्यश्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने सांगितलं की, एका रिपोर्टरने तिच्या मुलाच्या जन्मानंतर भाग्यश्रीच्या पतीला सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला होता आणि तेव्हा तिच्या मुलाचा नुकताच जन्म झाला होता.

सलमान खान आणि भाग्यश्रीचं अफेअर

अभिनेत्री भाग्यश्रीने अलिकडेच एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. भाग्यश्रीने सांगितलं की, तिच्या सोबत एक खूप विचित्र घटना घडली, ज्याचा खूप भयानक अनुभव होता. एक रिपोर्टर मुलाच्या जन्मासाठी शुभेच्छा द्यायला आली आणि त्या महिलेने भाग्यश्रीचा पती हिमालय याला सलमान खानसोबतच्या कथित प्रेमसंबंधांबद्दल प्रश्न विचारला होता. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ती या घटनेबद्दल सांगितलं.

"भाग्यश्रीचं सलमानसोबत अफेअर होतं आणि आता हा मुलगा..."

यावेळी भाग्यश्री म्हणाली की, "मी नुकताच माझ्या मुलाला जन्म दिला होता. माझी वहिणी रुमच्या बाहेर होती. त्यावेळी एक महिला रिपोर्टर मोठा पुष्पगुच्छ घेऊन मला भेटण्यासाठी आली. त्यांनी वहिणींना विचारलं की, मला भाग्यश्रीला भेटायचं आहे, त्यावर त्यांनी रुममध्ये येण्यास परवानगी दिली. त्यानंतर ती रिपोर्टर रुममध्ये आली आणि तिने हिमालयकडे पाहिलं आणि त्याला विचारलं की, तुम्हाला कसं वाटत आहे की, भाग्यश्रीचं सलमानसोबत अफेअर होतं आणि आता हा मुलगा झाला आहे".

अभिनेत्रीच्या डिलिव्हरीनंतर पतीला 'हा' विचारला प्रश्न

भाग्यश्रीने यावेळी सांगितलं की, तिच्या आयुष्यात कधीही कुणीही याबद्दल काही बोललं नव्हतं, असं काहीही नव्हतं. मैने प्यार किया चित्रपटाच्या वेळीही असं काही नव्हतं. सलमान खान एक जेंटलमेन होता आणि आमच्या दोघांमध्ये कधीही असं नातं नव्हत, कुणी कधीही याचा विचार केला नव्हता. आणि ही माझ्या डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. 

सेटवर सलमान करायचा फ्लर्ट

भाग्यश्री पुढे म्हणाली की, "एखाद्या व्यक्तीला किती वेदना होऊ शकतात, हे मला जाणवलं. मला त्याबद्दल इतके वाईट वाटलं की, त्यानंतर मी फ्लिमी मॅगजिन वाचणं बंद केलं". दरम्यान, कोविड गुप्ता फिल्म्स नावाच्या एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने सांगितलं होतं की, सलमान तिच्यासोबत फ्लर्ट करायचा, पण ते सर्व फक्त गंमत होती. यासोबतच भाग्यश्रीने सलमानचं खूप कौतुकही केलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pushpa 2 : रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम