Pushpa 2 The Rule OTT Release : अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाचा धमाका अद्यापही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही कब्जा करताना दिसत आहे. पुष्पा 2 चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून तिथेही 'पुष्पाराज'चा जलवा कमी झालेला दिसत नाही. दीड महिना बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटोटीवर प्रदर्शिक झालेल्या पुष्पा 2 ने नवा रेकॉर्ड केला आहे. डिजिटल स्ट्रिंमिंगमध्येही फक्त 'पुष्पाराज' पाहायला मिळत आहे.


'पुष्पा 2' चा धमाका कायम


पुष्पा 2 चित्रपट ओटीटीवर रिलीज होताच ट्रेडिंग लिस्टमध्ये टॉपवर पोहोचला आहे. अल्लू अर्जूनचा पुष्पा 2 द राईज चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता ओटीटी गाजवताना दिसत आहे. पुष्पा 2 चित्रपट कल्ट सिनेमा बनला आहे. थिएटरमध्ये पाहिल्यानंतर लोक ओटीटीवर हा चित्रपट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. वीकेंडला प्रेक्षकांनी ओटीटीवर पुष्पा 2 पाहण्याला पसंती दर्शवल्याने ओटीटीवर रिलीज होताच अवघ्या 24 तासांत हा चित्रपट डिजिटल स्ट्रिमिंगमध्ये अव्वल ठरला आहे. ओटीटी रिलीजनंतर अवघ्या 24 तासांत पुष्पा 2 ट्रेडींग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासोबतच आता आणखी नवा रेकॉर्ड अल्लू अर्जूनच्या नावावर झाला आहे.


अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम


'पुष्पा 2' चित्रपटातील डायलॉगपासून ते ॲक्शन सीन्सपर्यंत याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून आली. अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाचा दर्जा आणखी वाढला. अल्लू अर्जूनची 'पुष्पाराज'ची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे चाहत्यांना तो पाहणे सोपे झालं आहे. त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियताही वाढली आहे. पुष्पा 2 चित्रपट या वीकेंडला सर्वाधिक स्ट्रिम केला गेलेला चित्रपट आहे.



50 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर फक्त 'पुष्पाराज'


सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 : द रूल' गेल्या 50 दिवसांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या या चित्रपटाने आतापर्यंत भारतात सुमारे 1230.55 कोटी रुपये कमावले आहेत, तर जगभरातील कमाईच्या बाबतीत 1800 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.


आयएमडीबीच्या यादीत 'पुष्पा 2'चा समावेश


आयएमडीबीच्या ताज्या रँकिंगनुसार, अल्लू अर्जुनने भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप 25 सर्वात लोकप्रिय सुपरस्टार्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आयएमडीबीच्या यादीत 'पुष्पा 2'चा समावेश झाला आहे. कोणत्याही दक्षिणात्य तसेच भारतीय चित्रपटासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.