Shreyas Talpade :  अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल (Shreyas Talpade ) एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये श्रेयसच्या मृत्यूची खोटी बातमी होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना धक्काच बसला. श्रेयस तळपदेने स्वत: पोस्ट करून फेक न्यूजवर संताप व्यक्त केला. माझी प्रकृती चांगली असून मी जिवंत असल्याचे श्रेयसने स्पष्ट केले आहे. 


श्रेयसने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?


श्रेयसने तळपदेने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 'मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात होता त्या पोस्टची मला माहिती मिळाली. मला वाटतं की विनोदाचे स्वतःचे महत्त्व आहे, परंतु जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा त्याचे वास्तविक नुकसान होऊ शकते. विनोद म्हणून सुरू झालेल्या गोष्टीने आता प्रत्येकजण तणावात आहे आणि ज्यांना माझी काळजी आहे, विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या भावनांशी खेळत असल्याचेही श्रेयसने म्हटले. 


श्रेयसने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, माझी लहान मुलगी, जी दररोज शाळेत जाते, माझ्या तब्येतीबद्दल काळजीत असते आणि सतत प्रश्न विचारते आणि मी ठीक आहे हे जाणून घ्यायचे असते. या खोट्या बातम्या त्याला अधिक दुःखी करतात आणि त्याला अधिक प्रश्न विचारण्यास भाग पाडत असल्याचे त्याने म्हटले. जी लोक अशा या प्रकारच्या पोस्ट टाकतात, त्यांनी हे ते त्वरीत थांबवावे, त्यांचा काय परिणाम होईल याचा विचार करावा असे त्याने म्हटले. 


 






अशा फेक न्यूजच्या माध्यमातून तुम्ही ज्यांना टार्गेट करता, ती व्यक्ती दुखावली तर जातेच पण त्याचे कुटुंबीय आणि विशेषत: लहान मुले अशा परिस्थितीला पूर्णपणे समजू शकत नाही. त्यामुळे अशा फेक न्यूज थांबवा आणि कोणासोबतही असे कृत्य करू नका असे. तुमच्यासोबतही अशाच प्रकारचे कृत्य होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कृपया संवेदनशील व्हा, असे श्रेयसने सुनावले. 


वेलकम टू जंगल च्या चित्रीकरणा दरम्यान अभिनेता श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या श्रेयसची प्रकृती उत्तम आहे.