Sharad Kelkar : मराठमोळा अभिनेता शरद केळकर याला आता वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलं आहे. त्याच्या दमदार आवाजामुळे त्याचं बॉलिवुड विश्वात वेगळं असं स्थान आहे. दरम्यान, याच शरद केळकरने आता मोठा निर्णय घेतला आहे. बऱ्याच वर्षांपासून शरद केळकरने छोट्या पडद्यावर काम करणं सोडून दिलं होता. आता मात्र तब्बल 8 वर्षांनंतर त्याने पुन्हा एकदा छोड्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय घेतलाय.
शरद केळकरने काय निर्णय घेतला?
शरद केळकरने आपल्या करिअरच्या प्रवासात मोठा निर्णय घेतला आहे. आता त्याने छोट्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे शरद केळकर आता टीव्हीवर एका मालिकेत दिसणार आहे. 2017 सालानंतर शरद केळकर मालिकांत दिसला नव्हता. त्याने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. मधल्या काळात त्याने अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले. आता मात्र तो शरद छोट्या पडद्यावर परतणार असून तो 'तुम से तुम तक' या मालिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत निहारिका चौकसे ही अभिनेत्री दिसेल. हे दोघेही या मालिकेत मुख्य भूमिकेत असतील.
शरद केळकर दिसणार नव्या भूमिकेत
मिळालेल्या माहितीनुसार तुम से तुम तक या मालिकेसाठी करणसिंह ग्रोवर याचा आणि शरद केळकरचा विचार केला जात होता. मात्र मालिकेच्या निर्मात्यांनी बराच विचार करून शरद केळकरच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता तुम से तुम तक या मालिकेत शरद केळकर आणि निहारिका यांची जोडी कमाल दाखवणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ही मालिका 2025 सालाच्या आयपीएलमध्ये चालू होण्याची शक्यता आहे. या मालिकेची शूटिंग अद्याप चालू झालेली नाही. लवकरच शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शरद केळकरने कोणकोणते चित्रपट केले?
शरद केळकरने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांत काम केलेलं आहे. खरं म्हणजे मालिकांच्या माध्यमातूनच त्याच्या कामाला अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली. त्याने आतापर्यंत सर्वगुण संपन्न, उतरण, सलोनी का सफर, बैरी पिया, कुछ तो लोग कहेंगे, एजंट राघव यासारख्या मालिकांत काम केलेलं आहे. तर दुसरीकडे लय भारी, हिरो, हाऊसफूल-4, भूमी, गलियोंकी रासलीला राम-लीला, हलचल, तानाजी: द अनसंग वॉरियर, भेडिया आणि 1920 या चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत. याशिवाय त्याने बाहुबली, आदिपुरूष यासारख्या चित्रपटांच्या हिंदी डबिंगमध्ये अभिनेता प्रभाससाठी आवाज दिलेला आहे.
हेही वाचा :
सलग 58 तास एकमेकांना किस, बनवून टाकलं वर्ल्ड रेकॉर्ड, आता त्याच कपलने घेतला घटस्फोट!
Palak Tiwari :ब्युटी इन ब्लॅक; श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीचा ग्लॅम लूक!