मुंबई : 1990 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी'मधून एका रात्रीत स्टार बनलेले अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांना अफेजया नावाचा आजार झाला आहे. या आजारामुळे ते कोणतंही वाक्यं व्यवस्थित बोलू शकतं नाहीत. रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची शस्त्रक्रिया करण्यावर विचार करत आहे. परंतु, शस्त्रक्रिया करणं त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं आहे. त्यामुळे अद्याप त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे की, राहुल रॉय यांच्यावर उपचार सुरु असून ते औषधांना प्रतिसाद देत आहेत. तसेच त्यांचा वायटल पॅरामीटर सामान्य होत आहे. परंतु, यामुळे राहुल यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला आहे. तसेच एक हातही अशक्त झाला आहे. त्यांची रिकव्हरी फार सावकाश होत आहे. त्यांना नंतर फिजिओथेरपीच्या काही सेशन्सची गरज पडणार आहे.
औषधांचा होतोय परिणाम
दरम्यान, राहुल रॉय यांना कारगिलमध्ये 'LAC - लिव्ह द बॅटल'च्या चित्रीकरणादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. राहुल यांची बहीण प्रियांका आणि तिचे पती रोमिर सेन त्यांची काळजी घेत आहेत. रोमिर सेन यांनी राहुल यांच्या तब्बेतीबाबत सांगितलं की, "आम्ही राहुल यांच्या सोबत आहोत आणि डॉक्टरांनी जे ट्रिटमेंट करत आहेत, त्यांना ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. ते लवकरच ठीक होतील. परंतु त्यांच्यासाठी प्रार्थना करा."
28 नोव्हेंबरला रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय अभिनेते राहुल रॉय यांना 7 दिवसांपूर्वी कारगिलमध्ये चित्रिकर करत असताना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला. त्यावेळी त्यांना श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आलं. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या :
राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक, मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु