Iqbal Khan : छोट्या पडद्यावरचा अभिनेता इकबाल खानच्या (Iqbal Khan) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्या घरी छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे. इकबालची पत्नी स्नेहाने 11 फेब्रुवारी 2022 रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. इकबाल आणि स्नेहाला 'अमारा' नावाची मुलगीदेखील आहे. तर आता दुसऱ्या मुलीचे नाव त्यांनी 'इफ्झा' ठेवले आहे. 


एका मुलाखतीत इकबाल म्हणाला,"स्नेहाने बाळाचे नाव 'इफ्झा' ठेवले आहे.  'अमारा'ला एक लहान बहीण हवी होती. त्यामुळे आता ती खूप खूश झाली आहे. अमाराच्या जन्माने मी एक व्यक्ती म्हणून बदललो आहे. स्नेहा आणि इफ्जा दोघींची प्रकृती उत्तम आहे."






इकबाल 2007 साली स्नेहासोबत (Sneha Chhabra) लग्नबंधनात अडकला होता. इकबालने अनेक मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. इकबालने त्याच्या दुसऱ्या मुलीचा फोटो अद्याप सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. त्यामुळे चाहते आता त्याच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा बघण्याची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Fire On Bigg Boss Set : गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या सेटवर मोठी आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल


Bollywood Movies : एप्रिलमध्ये अमिताभ, आमिर, अजय आणि टायगरचे चित्रपट येणार आमनेसामने


Prajaktta Mali : ‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे!’, प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha