Bollywood Big Clashes April 2022 : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बॉलिवूड सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत. एप्रिल 2022 मध्ये अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. एप्रिलमध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण, आमिर खान आणि टायगर श्रॉफ सारख्या सेलिब्रिटींचे सिनेमे आमने-सामने येणार आहेत. 


14 आणि 29 एप्रिलला हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये बॉक्स ऑफिसवर बिग बजेट सिनेमांची टक्कर होणार आहे. आमिर खानचा 'लाल सिंघ चड्ढा' आणि यशचा 'केजीएफ 2' 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर अमिताभ बच्चन आणि अजय देवगणचा 'रनवे 34' आणि टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2' 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.





एप्रिलमध्ये 'लाल सिंघ चड्ढा',  'केजीएफ 2' आणि 'रनवे 34' आणि 'हिरोपंती 2' या सिनेमात स्पर्धा दिसणार आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्सऑफिसवर एकमेकांचे कलेक्शन कमी करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता या सिनेमांच्या रिलीज डेट निर्माते बदलणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


संबंधित बातम्या


Fire On Bigg Boss Set : गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या सेटवर मोठी आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल


Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!


राष्ट्रवादीत वाढलं कलाकारांचं इनकमिंग; अभिनेत्री आसावरी जोशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha