अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 06:50 PM (IST)
अझारिअस हे त्यांचं दुसरं अपत्य आहे. 11 ऑगस्ट 2017 ला त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान दुसऱ्यांदा बाबा झाला. फरदीनने आपल्या बाळाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. फरदीनने मुलाचं नाव 'अझारिअस' ठेवलं आहे. 'तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी खूप खूप आभार. डायनी, नताशा आणि एफकेकडून.' अशा कॅप्शनसह फरदीनने बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. https://twitter.com/FardeenFKhan/status/896625991292006400 अभिनेत्री मुमताझ यांची कन्या नताशासोबत डिसेंबर 2005 मध्ये फरदीन खानचं लग्न झालं. 2013 मध्ये त्यांची मोठी मुलगी डायनी एसाबेला खानचा जन्म झाला. अझारिअस हे त्यांचं दुसरं अपत्य आहे. 11 ऑगस्ट 2017 ला त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. https://twitter.com/FardeenFKhan/status/896218019088801792 1998 मध्ये 'प्रेम अगन' चित्रपटातून फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याचे ओम जय जगदिश, लव्ह के लिए कुछ भी करेगा, नो एंट्री, हे बेबी यासारखे काही चित्रपट गाजले. 2010 नंतर तो फारसा चित्रपटात दिसला नाही.