मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच आई बनणार आहे. सुनिधी प्रेग्नंट असून तिला पाचवा महिना सुरु आहे. याबाबत अद्याप जास्त लोकांना कल्पना नाही. फक्त कुटुंबीय आणि तिच्या मित्र परिवारालाच याची माहिती आहे.


सुनिधी 2012 मध्ये हितेश सोनिकसोबत विवाहबंधनात अडकली होती. करीना आणि सोहाप्रमाणेच सुनिधीला बेबी बम्प दाखवण्यात फारशी इच्छा नाही. त्यामुळे घरी राहून ती छोट्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी करत आहे. सध्या ती बाळाच्या स्वागतासाठी घर सजवत आहे.

सुनिधी प्रेग्नंट असल्याची वृत्ताला तिच्या वडिलांनी दुजोरा दिला आहे. "सुनिधी लवकरच आई बनणार आहे. ती बाळाबाबत फारच उत्सुक असून ती तयारी करत आहे. सुनिधी अतिशय मेहनती आहे. मला तिचा अभिमान आहे. आता मी आजोबा बनण्याची तयारी करत आहे. सुनिधी घरातच तिची सर्व कामं पूर्ण करत आहे. तिचं आरोग्य लक्षात घेता, तिला घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे," असंही सुनिधीच्या वडिलांनी सांगितलं.

सुनिधीने तिच्या करिअरची सुरुवात वयाच्या चौथ्या वर्षापासूनच केली. गाण्याच्या अनेक रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. मात्र टीव्ही अँकर तब्बसूमने तिचे कलागुण ओळखले. तिने सुनिधीच्या आई-वडिलांना मुंबईत येण्यास सांगितलं. यानंतर सुनिधीला दूरदर्शनवरील रिअॅलिटी शो 'मेरी आवाज सुनो'मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सुनिधी या शोची विनर होती.

सुनिधीने 'शीला की जवानी',  'इश्क सूफियाना', 'बीडी जलाई ले', 'देसी गर्ल', 'कमली', 'भागे रे मन' यांसारखी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.