Al Pacino Fourth Time Father At 83 Age: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल पचीनो  (Al Pacino) हा वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार आहे. अभिनेत्याच्या प्रतिनिधीने माहिती दिली आहे की,  अल पचीनो आणि त्याची  गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह (Noor Alfallah) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे. नूर ही आठ महिन्यांची गरोदर आहे.


अल पचीनो (Al Pacino) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह ही 29 वर्षाची आहे.   ती  एप्रिल 2022 पासून अल पचीनोला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. एकदा दोघांना डिनर डेटला जाताना स्पॉट करण्यात आलं होतं. नूर अलफल्लाहनं यापूर्वी ज्येष्ठ गायक मिक जेगर आणि  मिलेनियर  निकोलस बर्गरेन यांना डेट केले होते.


अल पचीनो आहे तीन मुलांचा बाप


अल पचीनो आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉन टेरंट यांना  ज्युली नावाची मुलगी आहे.  ज्युली ही 33 वर्षाची आहे.1997 ते 2003 या काळात अल पचीनोनं बेव्हरली डी'एंजेलोला डेट केलं. बेव्हरली डी'एंजेलो आणि अल पचीनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुलं आहेत. या मुलांचे वय 22 वर्ष आहे. आता अल पचीनो हा चौथ्यांदा बाप होत आहे.


अल पचीनोचे चित्रपट 


क्लासिक द गॉडफादर (The Godfather) सीरिजचा स्टार असणाऱ्या अल पचीनोने 'स्कारफेस', 'सेंट ऑफ अ वुमन', 'हीट', 'सर्पिको', 'सी ऑफ लव्ह', 'द डेव्हिल्स अॅडव्होकेट', 'द इनसाइडर' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.  जस्टिस फॉर ऑल , कार्लिटोज वे, डॉनी ब्रास्को, ओशनज थर्टीन अशा बऱ्याच आयकॉनिक चित्रपटांमध्ये देखील त्यानं महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच त्याच्या  'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड', 'द आयरिशमन', 'हाऊस ऑफ गुच्ची', 'द पायरेट्स ऑफ सोमालिया', 'डॅनी कॉलिन्स' या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


काही दिवसांपूर्वी 79 वर्षीय अभिनेता रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro) हा  सातव्यांदा बाप झाला. 'द आयरिशमॅन', 'द गॉडफादर: पार्ट 2', 'रेजिंग बुल' आणि 'टॅक्सी ड्राइव्हर' या चित्रपटामध्ये रॉबर्ट डी नीरोनं काम केलं आहे. एका मुलाखतीमध्ये रॉबर्ट डी नीरोनं सांगितलं होतं की, 'माझ्या आयुष्यात सातव्या मुलाचं आगामन झालं आहे.' 


इतर महत्वाच्या बातम्या:


Robert De Niro: वयाच्या 79 व्या वर्षी सातव्यांदा बाप झालाय 'हा' अभिनेता; चाहत्यांना गुडन्यूज देत म्हणाला...