Parineeti Chopra And Raghav chadha: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha)  या दोघांचा  लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नसोहळा पार पडल्यानंतर परिणीती आणि राघव हे दिल्लीमध्ये स्पॉट झाले आहेत. या नवविवाहित जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिणीती आणि राघव यांच्या या व्हायरल फोटो आणि व्हिडीओमधील नववधू परिणीतीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


विवाह सोहळ्यानंतर राघव आणि परिणीती हे दिल्लीमध्ये स्पॉट झाले. यावेळी नववधू परिणीती ही  पिवळ्या रंगाचा आऊटफिट, हातात बांगड्या, सिंदूर, मंगळसूत्र आणि मोकळे केस अशा लूकमध्ये स्पॉट झाली.  परिणीतीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 


पाहा व्हिडीओ:






उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करुन नेटकऱ्यांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.


परिणीतीने लग्नसोहळ्यात परिधान केलेला ब्रायडल लेहंगा हा डिझायनर  मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) डिझाइन केला होता. हा  ब्रायडल लेहंगा तयार करण्यासाठी  तब्बल 2500 तास लागले.


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ,"नाश्त्याच्या टेबलावर आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय आयुष्य जगू शकत नव्हतो. आता नव्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे". 






परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 13 मे 2023 रोजी दिल्लीमध्ये साखरपुडा झाला होता.  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच अनेक दिग्गज मंडळींनी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. 


संबंधित बातम्या:


Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: मनीष मल्होत्राने डिझाइन केला परिणीतीचा ब्रायडल लेहंगा; काय आहे खास? जाणून घ्या