Zarina Hashmi Google Doodle : गूगलचं आजचं डूडल (Google Doodle) खूपच खास आहे. गूगलने झरीना हाशमी (Zarina Hashmi) यांचं डूडल बनवलं आहे. त्यामुळे झरीना हाशमी नक्की कोण आहेत हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. झरीना हाशमी या भारतीय-अमेरिकन कलाकार आहेत. आज त्यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त गूगलने खास डूडल बनवलं आहे. 


झरीना हाशमी यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Zarina Hashmi)


झरीना हाशमी यांचा जन्म 1937 मध्ये भारतातील अलिगढ या गावात झाला आहे. फाळणीपूर्वी झरीना त्यांच्या कुटुंबियांसोबत भारतात राहत होत्या. पण फाळणीनंतर त्यांना पाकिस्तानातील कराचीला जावे लागले. वयाच्या 21 व्या वर्षी झरीना लग्नबंधनात अडकल्या आणि आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. दरम्यान ती बँकॉक, पॅरिस आणि जपानमध्ये गेल्या. 


झरीना 1977 रोजी न्यूयॉर्क शहराज स्थलांतरित झाल्या आणि तेथील महिला कलाकारांच्या मदतीला धावल्या. तेथील हेरिसीज कलेक्टिव्हची त्या सदस्य झाल्या आणि राजकारण, कला आणि सामाजिक न्याया अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क फेमिनिस्ट आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणून नव्या प्रवासाची सुरुवात केली. या माध्यमातून त्यांनी महिला कलाकारांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करुन दिली. 






एक भारतीय महिला कलाकार म्हणून झरीना आज लोकप्रिय आहे. पण स्थलांतराचा परिणाम त्यांच्या कलेवर झाला. 25 एप्रिल 2020 रोजी लंडनमध्ये अल्झायमरच्या आजाराने झरीना यांचे निधन झाले. झरीना यांचे डूडल न्यूयॉर्कमधील चित्रकार तारा आनंदने डिझाइन केलं आहे. झरीना यांनी उर्दू शिलालेखांवरही काम केलं आहे. मिनिमलिस्ट चळवळीशीही त्या निगडीत होत्या. 


झरीना हाश्मी त्यांच्या इंटॅग्लिओ आणि वुडकट प्रिंट साठी प्रसिद्ध होत्या. झरीना आपल्या कलेच्या माध्यमातून जगभरात लोकप्रिय झाल्या. झरीना या जागतिक पातळीवरच्या सिनेमाच्या मोठ्या प्रशंसक होत्या. त्यांनी फ्रेंच, उर्दू साहित्य आणि कविता यांसह तत्त्वज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आहे.


झरीना हाश्मी या भारतीय अमेरिकन कलाकार असण्यासोबत एक उत्तम प्रिन्टमेकरदेखील होत्या. रेखाचित्र, प्रिंटमेकिंग आणि शिल्पकलेत त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. अनेक लोकप्रिय पुरस्कारांनी झरीना यांना गौरवण्यात आलं आहे. 


संबंधित बातम्या


PK Rosy : पी.के रोझी यांच्या जयंतीनिमित्त गूगलचं खास डूडल; मल्याळम सिनेसृष्टीतील पहिल्या महिला अभिनेत्रीच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या...