Aastad Kale: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची लंडनमधून वाघनखे (Wagh Nakh) लवकरच भारतात आणण्यात येणार आहेत. यासाठी सरकारनं करार देखील केला आहे. छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल भारतीय सिनेसृष्टीतील नामवंत निर्माते, प्रतिभासंपन्न दिग्दर्शक, अभिनेते यांनी  काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांचा सत्कार देखील केला आहे. वाघनखांबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. पण सध्या अभिनेता आस्ताद काळेच्या (Aastad Kale) सोशल मीडियावर पोस्टची चर्चा होता आहे. 


आस्ताद काळेची पोस्ट



आस्ताद काळेनं नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं,  "वाघनखं" आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचं मानापासून अभिनंदन आणि आभार. पण ती आपल्याला "देऊन टाकली" नाही आहेत याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी. जगातील सर्व संग्रहालयं एकमेकांना स्वतःकडच्या वस्तू अशाप्रकारे काही काळापुरती देतच असतात.प्रचंड मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून यासाठी घेतली जाते. कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार त्यासाठी केला जातो. आणि एक प्रामाणिक शंका आहे. जाणकारांनी कृपया निरसन करावं. नतद्रष्ट अफझुल्याचं पोट फाडायला हीच वापरली होती, याचा ठोस काही पुरावा सादर झाला आहे का? हे मी Genuinely विचारतोय. पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आत्ता स्वगृही असल्याचा आनंद निश्चितच आहे.' आस्तादच्या या पोस्टनं सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



कलकारांनी केला सुधीर मनुगंटीवार यांचा सत्कार 



वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल काही दिवसांपूर्वी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलकारांनी सुधीर मनुगंटीवार यांचा सत्कार केला.  सुधीर मनुगंटीवार यांनी ट्विटरवर कलाकारांचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल भारतीय सिनेसृष्टीतील नामवंत निर्माते, प्रतिभासंपन्न दिग्दर्शक, अभिनेते यांनी आज मुंबईत घरी येऊन माझा सत्कार आणि अभिनंदन केले हा माझ्या जीवनातील आणखी एक अनमोल क्षण ठरला. "   






सुभाष घई, अभिनेते जॅकी श्रॉफ, निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते शरद केळकर, संदीप कुलकर्णी, विजय पाटकर, भारत गणेशपुरे, समीर दीक्षित, सौरभ गोखले, अभिनेत्री मेघा धाडे, शिव ठाकरे, संदीप घुगे यांनी सुधीर मनुगंटीवार  यांचा सत्कार केला. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Wagh Nakh : महाराष्ट्राला वाघनखांची प्रतीक्षा अन् स्वागताची सुरूवात लंडनमधून, साऊथ हॉलच्या दारी झळकलं पोस्टर