Salman Khan Katrina Kaif Tiger 3 Leke Prabhu Ka Naam Song Released : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची सिनेरसिकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'लेके प्रभू का नाम' (Leke Prabhu Ka Naam) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


'टायगर 3' या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील 'लेके प्रभू का नाम' हे पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सलमान आणि कतरिनाची क्रेमिस्ट्री पाहून चाहते खूश झाले आहेत. 'लेके प्रभू का नाम' हे गाणं अरिजीत सिंहने गायलं आहे. 


सलमान खान आणि कतरिना कैफ ही रुपेरी पडद्यावरची सुपरहिट जोडी आहे. त्यांना एकत्र पाहणं हे प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. आता 'टायगर 3'च्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. 'टायगर 3' सिनेमातील 'लेके प्रभू का नाम' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात सलमान खान आणि कतरिना कैफची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 


सलमानसाठी अरिजीतने गायलं 'लेके प्रभू का नाम' गाणं 


'लेके प्रभू का नाम' हे गाणं अरिजीत सिंह आणि निकिता गांधी यांनी गायलं आहे.  सलमान खानसाठी पहिल्यांदाच अरिजीत सिंहने हे गाणं गायलं आहे. 2014 मध्ये सलमान खान आणि अरिजीत सिंहमध्ये मतभेद झाले होते. आता दोघांच्यात पॅचअप झालं असून अरिजीतने 'टायगर 3' या सिनेमातील पहिलं गाणं गायलं आहे.


'टायगर 3'कधी होणार रिलीज? (Tiger 3 Release Date)


'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनीष शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'टायगर 3' या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 2023 वर्षातला सलमानचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 



संबंधित बातम्या


Tiger 3 Katrina Kaif Fight Scene: ‘टायगर 3’ मध्ये कतरिनासोबत ‘टॉवेल फाईट’ करणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या स्टंट वुमनबाबत...