Aarti Chabria Flaunts Baby Bump:  अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री आरती छाब्रियाने (Aarti Chabria) नुकतच तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आरती ही लवकरच आई होणार असून त्यांच्या घरी एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे. आरतीने नुकतच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली. आरतीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आरतीने चित्रपटांपेक्षा जाहिरातींमधून जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, सध्या ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. 


'शूटआउट ॲट लोखंडवाला' आणि 'हे बेबी' यांसारख्या चित्रपटांमध्ये आरती झळकली होती. या अभिनेत्रीने 25 जून 2019 रोजी विशारदसोबत गुपचूप लग्न केलं. पारंपारिक पद्धतींनुसार आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आरतीने लग्नगाठ बांधली होती. तिने तिच्या लग्नाचे देखील फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यानंतर आता तिने नुकतच तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या बेबी बंपचा व्हिडिओ शेअर केला आहे. 






अनेक जाहिरातींमध्ये झळकली आहे आरती


आरती छाब्रियाने अनेक ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरतीने तिच्या करिअरमध्ये टूथपेस्ट, आइस्क्रीम फेस वॉश, इन्स्टंट नूडल्ससह 300 हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. दरम्यान आरतीने अक्षय कुमारसोबत आवारा पागन दीवना या चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप बॉलीवूडवर उमटवली. त्यानंतर तिच्या करिअरला देखील एक कलाटणी मिळाली. 






लग्नानंतर सिनेसृष्टीपासून दूर


आरती ही लग्न झाल्यापासून सिनेसृष्टीपासून दूर राहत असल्याचं समोर आलं आहे. तसेच तिचा नवरा हा ऑस्ट्रेलियात राहणारा आहे. त्यामुळे लग्नानंतर आरती देखील तिच्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. आरती ही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटो देखील तिच्या सोशल मीडियावरुन शेअर करते. 


ही बातमी वाचा : 


Arun Govil Property : लाखो रुपयांची गाडी, मुंबईत आलिशान घर, कोट्यावधी रुपयांची मालमत्ता; छोट्या पडद्यावरील 'रामा'ची संपत्ती किती?