Aapdi Thaapdi : "आपडी थापडी" (Aapdi Thaapdi) या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेच्या (Shreyas Talpade) बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत "आपडी थापडी" हे बडबडगीत म्हटलं आहे. याआधी अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर आणि नंदू माधव यांच्याही बेबीफेसला उत्तम प्रतिसाद मिळाला. "आपडी थापडी" हा चित्रपट 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 


के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे. 


पाहा व्हिडीओ: 






कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटीलची गोष्ट


अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीजरमधून दिसतं. त्यामुळे टीझर पाहून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे. आता उत्सुकता आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. 'आपडी-थापडी' ही एक मनोरंजक कथा सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Aapdi Thaapdi : 'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकरची चित्रपटात एन्ट्री, ‘आपडी थापडी’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!