मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर सातत्याने सुपरहिट चित्रपट देत आहे. पण 2018 ची दिवाळी त्याच्यासाठी नुकसानीची ठरली. आमीरचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा सलमान खानच्या 'ट्यूबलाईट'पेक्षाही मोठा फ्लॉप चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे.
मल्टिस्टारर 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' दिवाळीसारख्या मोठ्या सणाला आणि मोठ्या विकेण्डला प्रदर्शित झाला. त्यामुळे चित्रपट शानदार कमाई करेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. सिनेमावर केलेला खर्च भरुन काढण्यासाठी किमान 250 कोटी रुपयांचा गल्ला जमवणं गरजेचं होतं.
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 50 कोटी रुपयांची कमाई करत फर्स्ट डे कलेक्शनचा विक्रमही रचला. परंतु प्रेक्षक आणि समीक्षकांच्या निगेटिव्ह रिव्ह्यूनंतर कमाईचा आलेख असा घसरला की, त्यामुळे कोणाचाही फायदा झाला नाही.
विजय कृष्णा आचार्य दिग्दर्शित, आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असेलल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'चं नुकसान सलमान खानच्या 'ट्यूबलाईट' एवढंच असल्याचं समजतं. यामुळे वितरक सध्या अडचणीत असून ते आपल्या नुकसानभरपाईसाठी आमीर खान आणि यशराज फिल्म्सकडे जाण्याचा विचार करत आहेत.
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा सलमान खानच्या ट्यूबलाईट आणि शाहरुख खानच्या 'जब हॅरी मेट सेजल'पेक्षा मोठा फ्लॉप चित्रपट असल्याचं समजलं जात आहे. खरंतर या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी चांगली कमाई केली होती. पण 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'मधून सध्या यशराज फिल्म्सला कोणताही फायदा झालेला नाही. मात्र जर चित्रपटाने चीनमध्ये चांगली कामगिरी केली, तर प्रॉडक्शन हाऊससाठी ती फायदाचा सौदा ठरु शकते.
सलमानच्या 'ट्यूबलाईट'पेक्षाही आमीरचा 'ठग्ज...' फ्लॉप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2018 08:04 AM (IST)
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 50 कोटी रुपयांची कमाई करत फर्स्ट डे कलेक्शनचा विक्रमही रचला. परंतु प्रेक्षक आणि समीक्षकांच्या निगेटिव्ह रिव्ह्यूनंतर कमाईचा आलेख असा घसरला की, त्यामुळे कोणाचाही फायदा झाला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -