मुंबई : दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित सिनेमात व्यस्त आहे. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. पण बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानची चित्रपटात महत्त्वाची भूमिका असल्याचं कळतं.

 
काही वृत्तानुसार, आमीर खान या सिनेमात संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. राजकुमार हिरानीने जर या सिनेमात आमीरला घेतलं, तर हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ही अनोखी कास्टिंग समजली जाईल.

 
आमीर खान संजय दत्तच्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी आहे, यात शंका नाही. पण आमीरचं व्यक्तिमत्त्व आणि सुनील दत्त यांचं व्यक्तिमत्त्व यात कोणतंही साम्य नाही, हेदेखील तेवढंच खरं. त्यामुळे आमीर खान या सिनेमात सुनील दत्त यांची भूमिका साकारणार का, हे लवकरच कळेल.