Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. लवकरच त्याचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chadhha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. पण आमिरनं सर्व लोकांना हा चित्रपट बघण्याचे आवाहन केलं. नुकतेच 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chadhha) या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. या  स्क्रिनिंगला चिरंजीवी, एस एस राजामौली, पुष्पा चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि सुपरस्टार नागार्जुन यांनी हजेरी लावली. चित्रपट पाहिल्यानंतर आता नागार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


नागार्जुन यांनी ट्विटर अकऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. नागार्जुन यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'आमिर खानचा लाल सिंग चड्ढा  बघण्याचे सौभाग्य लाभले. हा चित्रपट एखाद्या ताज्या हवेप्रमाणे आहे. हा चित्रपट तुम्हाल  हसवेल आणि रडवेलही. या चित्रपटामधून खूप साधा मेसेज देण्यात आला आहे.'


नागा चैतन्यचं देखील केलं कौतुक
नागार्जुन त्याच्या मुलाचे म्हणजेच नागा चैतन्यचे देखील कौतुक केलं आहे. तो म्हणाला, 'अभिनेता म्हणून नागा चैतन्यचा विकास होत आहे. हे पाहून खूप छान वाटत आहे. ' ट्वीटमध्ये नागार्जुन यांनी दिग्दर्शक अद्वैत चंदन, लेखक अतुल कुलकर्णी यांचे कौतुक केले.  


पाहा ट्वीट:




लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18  स्टडियोज  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


वाचा इतर बातम्या: