Tamanna Bhatia And Vijay Varma Break Up : प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अभिनेता विजय वर्म गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये होते. आता मात्र त्यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ते एकमेकांपासून वेगळे झाल्याचे सांगितले जातेय. हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, असे म्हटले जात होते. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे त्यांचे चाहतेही चांगलेच खूश होते. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. असे असतानाच तमन्ना भाटीयाने प्रेमाबद्दल काही महत्त्वाची विधानं केली आहेत.
तमन्ना भाटीया प्रेमावर नेमकं काय म्हणाली?
तमन्ना आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप झाल्याची फक्त चर्चा आहे. या दोघांनीही आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या दोघांनीही आपापल्या समाजमाध्यम खात्यावरील एकमेकांचे फोटो डिलीट केल्याचं सांगितलं जातंय. असे असताना तमान्ना भाटीयाने एका मुलाखतीत प्रेमाविषयी तिची मतं मांडली आहेत 'मला प्रेमाबद्दल नुकतेच काही नव्या बाबी समजून आल्या आहेत. लोक प्रेम आणि नातं (रिलेशनशीप) यात गफलत करतात. हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यासोबतच होत नाही. ते मित्रांमध्येही घडतं. जेव्हा प्रेमात अटी आणि नियम येतात त्याच क्षणाला प्रेम संपतं असं मला वाटतं. प्रेमात कोणत्याही अटी आणि नियम नसावेत असं मला वाटत,' असं तमन्ना भाटीया म्हणाली.
आपले विचार थोपवणं म्हणजे प्रेम नव्हे
'दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतात. पण प्रेम हे एकतर्फी करायची गोष्ट आहे. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला बंधनातून मुक्त केल पाहिजे. तुम्ही तुमचे विचार त्या व्यक्तीवर थोपवून प्रेम करू शकत नाही. संबंधित व्यक्ती सध्या जशी आहे, त्यामुळेच तर तुम्ही प्रेमात पडता,' असेही मत तमन्ना भाटीयाने व्यक्त केले.
दोघे अनेकदा दिसले एकत्र
दरम्यान, तमन्ना आणि विजय वर्मा हे लस्ट स्टोरी वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगदरम्यान एकमेकांजवळ आले. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. हीच मैत्री नंतर प्रेमात बदलली. एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी अनेकदा आपलं नातं जाहीर केलेलं आहे. रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर हे दोघे अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. विमानतळ, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सोबत स्पॉट झालेले आहेत. आता मात्र ते विभक्त झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा :
Rinku Rajguru: महाराष्ट्राच्या लाडक्या आर्चीचा मराठमोळा अंदाज, रिंकु राजगुरुचे नवे फोटो पाहाच!
बॉलिवूडच्या देसी गर्लने विकले मुंबईतले 4 आलिशान फ्लॅट्स, विक्रीची किंमत वाचून चकित व्हाल!
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा देसी अंदाज ; पिवळ्या साडीत दिसतेय खास!