Ira Khan Nupur Shikhare Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खानने (Ira Khan) नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) रजिस्टर मॅरेज केलं असून आता शाही पद्धतीने पुन्हा लग्नबंधनात अडकण्यास ते सज्ज आहेत. उदयपूरमध्ये 8 जानेवारी 2024 रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे.


उदयपूर येथील प्रसिद्ध ताज अरावली या महागड्या हॉटेलमध्ये आयरा आणि नुपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. या हॉटेलमध्ये 176 रुम, 4 मोठे डायनिंग हॉल आहे. 40 एकरचा हा लक्षवेधी परिसर आहे. 


आमिर खानच्या लेकीचा शाही विवाहसोहळा 8 ते 10 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. आमिर खान स्वत: लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमात लक्ष घालत आहे. या कार्यक्रमादरम्यान आमिर एक गाणं गाणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आमिरच्या गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


176 रूम्स केलेत बुक


उदयपूर येथील ताज अरावली रिसोर्टमधील 176 रुम्स बुक करण्यात आले आहेत. एकंदरीतच पाहुण्यांसाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आलं आहे. उदयपूरमध्ये होणाऱ्या या लग्नसोहळ्यात 250 पेक्षा अधिक पाहुणे हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. 


हॉटेलमधील डिलक्स रुमची एका रात्रीसाठीची किंमत 25 ते 28 हजार रुपये आहे. यात सकाळचा नाश्ता आणि जेवणाचादेखील समावेश आहे. या हॉटेलमधील टेंट पैनापरोमा खोलीची किंमत 33 ते 38 हजार रुपये आहे. गार्डन व्ह्यू असलेल्या खोलीची किंमत 35 ते 38 हजार रुपये आहे. 


आयराच्या पोस्टने वेधलं लक्ष


आयराने वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"वर्कआऊट शिवाय आमचं लग्न होऊ शकतं का? वार्मअप : ब्रिंग सैली अप, पुशअप्स... वर्कआऊट : पुश अप्स, जम्प स्क्वैट्स, नमस्कार पुश अप्स, स्कवैट एंड प्रेस, वाइड पुश अप्स, साइड स्क्वैट्स बर्पीज, डंकी किक्स". 






आयरा खानची (Ira Khan) आई रीना दत्तादेखील उदयपुरला पोहोचली आहे. आयरा आणि नुपूरचं वेडिंग रिसेप्शन मुंबईतील (Mumbai) नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. या रिसेप्शनला मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात, असा अंदाज आहे. 


संबंधित बातम्या


Ira Khan Nupur Shikhare : लग्नानंतर इरा-नुपूरकडून बेडरुममधील फोटो शेअर, आमिरच्या लेकीचा नवऱ्यासोबत सेल्फी