Aamir Khan And Nana Patekar Viral Video on Social Media : नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा वनवास सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नाना सध्या बऱ्याच मुलाखती देत असल्याचं पाहायला मिळतंय. पण असं असतनाच सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा एक स्पेशल व्हिडीओ बराच व्हायरल होतोय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत या व्हिडीओमध्ये त्यांचा खास मित्र आमिर खानही (Aamir Khan) पाहायला मिळतोय. नाना आणि आमिरच्या मैत्रीचा अगदी साधा, सरळ आणि खास अंदाज यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहता आला.
नाना पाटेकर त्यांच्या वनवास सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आमिर खानसाठी करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच आमिर खान आणि नाना पाटेकर यांची ही भेट झाली. एका पॉडकास्टसाठी नाना गेले असता तिथे ही भेट झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. नाना पाटेकर आणि आमिर खान वनवासवर या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता या पॉडकास्टविषयी देखील बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.
नाना आणि आमिरच्या साधेपणाचं नेटकऱ्यांकडून कौतुक
दरम्यान नाना पाटेकर आणि आमिर खानच्या साधेपणाचं यावेळी नेटकऱ्यांनी कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. नाना पाटेकर हे त्यांच्या नेहमीच्या साध्या पोशाखात होते. पण आमिर देखील अगदी साध्या पोशाखात दिसला. गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्याखाली पांढऱ्या रंगाचा लेंगा आमिरने परिधान केला आहे. कट्ट्यावर बसून हे दोन्ही मित्र निवांत गप्पा मारताना दिसलेत.