Allu Arjun on Pushpa 2 stampede row: हैदराबादमध्ये 4डिसेंबर रोजी 'पुष्पा 2'च्या (Pushpa 2) प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच या मृत महिलेचा आठ वर्षांचा मुलगाही यामध्ये गंभीर जखमी झाला. या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर आता तेलगंणाच्या विधानसभेतही (Telangana Assembly ) हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी विधानसभेत अल्लू अर्जुनवर (Allu Arjun) निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) यांनीही अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केलेत. 


सध्या तेलगंणात सुरु असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत पुष्पा 2 अडकला आहे. पण यावर अल्लू अर्जुनने मात्र प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या चारित्र्यांच हनन केलं जातंय, असा आरोप अल्लू अर्जुनने लावला आहे. संध्या थिएटरमधील घटनचे हैदराबादमध्ये बरेच पडसाद उमटले आहेत. आता तर राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे आता ही घटना राजकीय वळण घेत असल्याचं पाहायला मिळतंय. 


मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काय म्हटलं?


तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना म्हटलं की, अभिनेता हा अगदीच बेफिकीर होता कारण मृत्यूची माहिती मिळूनही तो थिएटरमधून बाहेर पडला नाही. ते कुटुंब महिन्याला 30 हजार रुपये कमावतं. पण केवळ त्यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा फॅन आहे म्हणून ते त्याच्या सिनेमाच्या तिकीटावर 3000 रुपये खर्च करतात. 


अल्लू अर्जुनने काय म्हटलं?


मुख्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत या सगळ्यावर भाष्य केलं आहे. अल्लू अर्जुनने म्हटलं की, हा एक अपघात होता. त्या कुटुंबासाठी मी माझ्या संवेदनाही व्यक्त करतो. यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही. पण सध्या माझं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चुकीची माहिती पसरवली जातेय. जे काही घडलंय, त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो. मी कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करण्यासाठी आलो नाही. मी केल्या 20-21 वर्षात जे काही कमावलं आहे, ते एका घटनेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 


ही बातमी वाचा : 


Sukh Mhanje Nakki Kay Asta : अखेर निरोपाची वेळ आलीच, 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; शुटींगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक