Aaditya Thackeray :  मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतूचे (Atal Setu) काही महिन्यांपूर्वीच अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या पाचच महिन्यात या पुलाला तडे गेल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी जाऊन अटल सेतूची पाहणी केली आणि यासाठी सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं. त्यामुळे अटल सेतूवरुन सध्या राजकीय वार प्रतिवार सुरु असल्याचं चित्र आहे. त्यातच आता आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) या वादात रश्मिका मंदानाला देखील सवाल केला आहे. 


लोकसभा निवडणुकांच्या आधी अभिनेत्री रश्मिका मंदाना हीने अटल सेतूची जाहिरात केली होती. रश्मिकाच्या या व्हिडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचं अभिनंदन केलं होतं. पण त्यावेळी देखील आदित्य ठाकरेंनी पोस्ट करत काही गोष्टी समोर आणल्या होत्या. त्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं. पण आता या पुलालाच तडा गेल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 


आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?


ज्या प्रकारे यावर संबंधित प्रमुख व्यक्तींनी यावर उत्तर दिलंय, ते अत्यंत उद्धटपणाचं होतं, त्यांना आधी निलंबित करायला हवं. जगात हे कुठेही झालं असतं. पण आपल्याकडे अभिमानाने सांगतात की, हे खचलं आहे, पावसाळ्यात ते खचतंच, ही काय उत्तर झाली नाहीत. आता तिथे व्हिडिओ बनवणारे अॅक्टर्स कुठे आहेत, असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. 


अटल सेतूसंदर्भात MMRDA ने केलेला खुलासा


अटल सेतूचे प्रोजेक्ट हेड म्हणाले, अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या  जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.  अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. सदर पोहाचमार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नसून त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.                                                       



ही बातमी वाचा : 


Tharla Tar Mag : 'लेट आला असतास, पण आला तरी असतास'; 'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकाराचं निधन, जुई गडकरीची भावुक पोस्ट