83 on OTT : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणवीर सिंहचा (Ranveer Singh) '83' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. चांगली कथा, उत्तम कलाकार असूनदेखील हा सिनेमा फारशी कमाई करू शकला नाही. पण आता रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रणवीर सिंहचा '83' सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


'83' सिनेमा नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच दिवशी प्रदर्शित होऊ शकतो. 18 फेब्रुवारी किंवा 25 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे रणवीरच्या चाहत्यांना घरबरल्या '83' सिनेमा पाहता येणार आहे. 


बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, '83' सिनेमा नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टार या दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित होणार आहे. तर डिस्ने हॉटस्टारवर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. 


'83' सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. कपिल यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली आहे.


संबंधित बातम्या


Jhund Song Teaser : बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमातील गाण्याचा टीझर आऊट, व्हॅलेंटाईन डेला गाणं होणार रिलीज


Bollywood Movies : एप्रिलमध्ये अमिताभ, आमिर, अजय आणि टायगरचे चित्रपट येणार आमनेसामने


Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!


Prajaktta Mali : ‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे!’, प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt] [/yt]