Nagraj Manjule : सैराट फेम नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्त होत असतात. अशातच आता नागराजची इंस्टा पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने एका कवितासंग्रहाबाबत भाष्य केलं आहे. लवकरच कवितासंग्रहाचं प्रकाशन होणार आहे.
नागराज मंजुळे एका संग्राम नावाच्या तरुणाचा कवितासंग्रह प्रकाशित करत आहे. नागराज मंजुळेला विक्रांतच्या कविता प्रचंड भावल्या. त्यामुळेच त्याने या कवितासंग्रहाचं प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. आटपाडी प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून या कविता प्रेक्षकांना वाचायला मिळणार आहेत. या कवितासंग्रहावर भाष्य करणारी नागराजची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
नागराज मंजुळेने लिहिलं आहे," कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एखादी चांगली कविता वाचली की खूप समृद्ध झाल्यागत वाटतं.काही वर्षांपूर्वी विक्रांतच्या तोंडून संग्रामच्या कविता ऐकल्या आणि भारावून गेलो. नंतर कळलं की संग्रामनं एकही कविता कधी कुठं प्रकाशित केली नाही. 'अलुफ', 'आत्ममग्न' संग्रामनं त्याची कविता मित्रांच्या मैफिलीबाहेर कुठं जाऊच दिली नाही. संग्रामनं जणू आपल्याच गाळलेल्या जागा भरल्या आहेत. या रिकाम्या पोकळीत आपल्यागतच आणखी एक जीव या रिक्ततेचा अर्थ लावत बसला आहे हे जाणून जरासं दु:ख वाटलं."
नागराजने पुढे लिहिलं आहे,"संग्रामच्या कविता मला प्रचंड आवडल्या.वाटलं या कवितांची अनुभूती, आनंद सगळ्यांना घेता यावा म्हणूनच आटपाटच्या माध्यमातून 'रिकामटेकड्याचे आत्मवृत्त' हा संग्राम बापू हजारे या मित्राचा पहिला संग्रह प्रकाशित करतोय...आशा आहे तुम्हाला आवडेल.भेटू सांगलीत....27 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजताविष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली".
संबंधित बातम्या