सेटवर राडा करणारे, क्रू मेंबरला मारहाण करणारे गुंड नसून तेदेखील चित्रपट/मालिका इंड्स्ट्रीचा भाग आहेत, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दोन लोकेशन मॅनेजरमधील वादामुळे हा राडा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सेटवरील कलाकारांना मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल करणे या कलमांखाली तीन जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान रोहित गुप्ता नावाचा त्यांचा चौथा साथीदार फरार आहे.
'फिक्सर' या वेब सिरीजच्या शुटींगसाठी घोडबंदर येथील लोकेशन ठरवण्यात आले होते. परंतु त्याचे काम आधी आपल्याला मिळाले होते, असा दावा आरोपींनी केला आहे.
दरम्यान घोडबंदर परिसरातील एका शिपयार्डमध्ये 'फिक्सर'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग सुरु होते, त्यावेळी चार गुंडांनी तिथे हैदोस घातला आणि मारहाण केल्याचे माहीने सांगितले होते. चित्रिकरणाची परवानगी नसल्याचे सांगत त्यांनी समोर येईल त्याला रॉड आणि दंडुक्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. सेटवरील कॅमेऱ्यांसह महागड्या सामानाची तोडफोड केल्याचेही टीमचे म्हणणे आहे.
फिक्सर वेबसिरीजच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना रॉडने मारहाण, काही कलाकार जखमी | वसई | ABP Majha
अल्ट बालाजीची निर्मिती असलेल्या या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा 'काल' चित्रपटाचे दिग्दर्शक सोहम शाह यांच्यावर आहे. हल्ल्यात शाह यांच्यासह छायाचित्रकार संतोष थुडियाल जखमी झाले. संतोष यांच्या डोक्याला जखम झाल्यामुळे सहा टाके पडले आहेत. सेटवर गुंडांनी राडा घातला, त्यावेळी वेब सीरिजमध्ये भूमिका करणारे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया, अभिनेता शब्बीर अहलुवालियाही उपस्थित होते.
वेबसिरीजच्या शूटिंगदरम्यान कलाकारांवर हल्ला, कलाकारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | मुंबई | ABP Majha
दरम्यान, काही गुंड माझ्या दिशेनेही मारहाण करण्यासाठी आले होत, परंतु महिलांना हात लावू नका, असं कोणीतरी म्हणाल्यामुळे ते मागे फिरले, असं माहीने सांगितलं. आमच्या वॅनिटी वॅनची तोडफोड झाल्यामुळे सेटवरील तंत्रज्ञांनी मला एका गाडीत सुरक्षित बसवलं, मात्र माझ्या ड्रायव्हरला जबरदस्त मारहाण करण्यात आली, असाही आरोप माहीने केला आहे.