Vidya Balan Ami Je Tomar 3.0: बॉलिवूडमध्ये सध्या भूल भुलैय्या चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ती या सिनेमातील आयकॉनिक 'आमी जे तोमार' या गाण्याच्या रिलिजने. १ नोव्हेंबरला भूल भुलैय्या चित्रपट सिनेमाघरामध्ये दाखवला जाणाार आहे. दरम्यान, आपल्या दिलखेचक अदाकारीनं दरबारातील दोन्ही मंजुलिका विद्या आणि माधुरी या नृत्यांगणा प्रेक्षकांनाही खिळवून ठेवत आहेत. दरम्यान एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात विद्या आणि माधुरी एकाच स्टेजवर नाचताना दिसत आहेत. पण नाचताना अचानक विद्याचा तोल जाऊन ती स्टेजवर नाचता नाचता पडताना दिसतेय.
नाचता नाचता पडली पण क्षणार्धात सावरलं
भूलभुलैय्या 3 सिनेमातील आमी जे तोमार गाणं सध्या प्रेक्षकांना भेटीला आलं आहे. रिलिजनंतर या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. दरम्यान स्टेजवर या गाण्यावर विद्या आणि माधुरीचे नृत्य सुरु असताना विद्या नाचता नाचता खाली पडली. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच फिरतोय.भर शोमध्ये खाली पडली पण पडल्याचं कोणालाही कळू न देता विद्यानं प्रसंगावधान दाखवत पटकन स्वत:ला सावरलं आणि आपली स्टेप पूर्ण केली. विशेष म्हणजे तिनं एवढ्या सफाईदारपणे तो प्रसंग सावरला की अनेकांना कळलंही नाही ती पडली होती. हा व्हिडिओ सध्या झपाट्यानं व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना विद्याचं हेच प्रसंगावधान भावलं आहे. समाजमाध्यमावर विद्याच्या अदाकारीचं आणि तिच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतूक होतंय.
चेहऱ्यावरचं लावण्य कायम ठेवत सावरलं
नाचता नाचता पडली असली तरी चेहऱ्यावरचं लावण्य आणि एक्सप्रेशन कायम ठेवत त्यातूनच आपली अदाकारी दाखवत विद्यानं सारा प्रसंग ज्या पद्धतीनं हाताळला त्याचं नेटकऱ्यांकडून कौतूक होतंय. अगदी एखाद्या सेकंदात घडलेल्या विद्याच्या प्रसंगावधान नेटकऱ्यांनीही वाखाणलंय.
विद्यासोबत माधुरीची जुगलबंदी
विद्या बालन मंजुलिका असणाऱ्या पहिल्या चित्रपटातील भूल भुलैया या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसली होती, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यनने या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि प्रेक्षकांनाही अरिजितच्या आवाजातील हे गाणे खूप आवडले होते. तब्बूनेही या गाण्यावर डबल रोलमध्ये डान्स केल्याचं दिसलं होतं. आता 'भूल भुलैया 3'मध्ये या गाण्यावर दोन मंजुलिका दिसल्या आहेत.. या चित्रपटात माधुरीला दुसरी मंजुलिका म्हणून दाखवण्यात आले आहे. या गाण्यात विद्या आणि माधुरीची जुगलबंदीही पाहायला मिळाली. श्रेया घोषालच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे, तर विद्या आणि माधुरीचा अभिनयही अप्रतिम आहे.
हेही वाचा: