Sujay Vikhe vs Balasaheb Thorat: आगामी विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक उमेदवारांनी राजकीय प्रचाराला सुरु केली आहे. याचदरम्यान अहमदनगरमधील संगमनेर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या एका जाहीर सभेत वसंत देशमुख यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संगमनेरमध्ये वाद निर्माण झाला आहे. 


वसंत देशमुख यांचं ते विधान-


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यासभेत सुजय विखे मंचावर असताना भाजपचे वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. आपल्या कन्येला समजवा...नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे, असं वक्तव्य वसंत देशमुख यांनी केले. वसंत देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.


धांदरफळ गाव बंद ठेऊन निषेध-


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सुजय विखेच्या सभेत धांदरफळ गावातीलच वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होतोय. काल रात्रीच्या जाळपोळच्या घटनेनंतर आता तालुक्यातील परिस्थित नियंत्रणात आहे. धांदरफळ गावामध्ये काल रात्री मोठा गोंधळ झाल्यानंतर सभा स्थळावरील सुजय विखे पाटलांच्या युवा संकल्प मेळाव्याचे बँनर थोरात समर्थकांकडून निषेध फाडले गेले होते आणि त्याचबरोबर जयश्री थोरात यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत धांदरफळ गाव बंद ठेवण्यात आलं आहे. 


पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या-


सदर घटनेनंतर रात्री दहाच्या सुमारास जयश्री थोरात डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल 7 तास हे आंदोलन सुरू असून पहाटे पाच पर्यंत दोन फिर्यादी दाखल करण्यात आले असून तिसरी फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 


संबंधित बातमी:


आता परत वेळ आली आहे नीच लोकांना त्यांची जागा... जयश्री थोरातांवरील टीकेनंतर सत्यजीत तांबे भडकले