Bappi Lahiri last rites : जवळपास पाच दशके आपल्या संगीताने आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज (गुरवार) त्यांच्यावर मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीतअंत्यस्कार करण्यात आले. यावेळी शक्ति कपूर, इला अरुण, अलका याग्निक, निखिल द्विवेदी रुपाली गांगुली, मिका सिंह, बिंदु दारा सिंह हे कलाकार उपस्थित होते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) नावाच्या आजाराने झाला. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून या आजाराचा सामना करत होते. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेली काही दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं.
बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली. बप्पी लाहिरींना संगीताचं सुरुवातीची शिक्षण आपल्या घरातच मिळालं. वयाच्या 17 वर्षापासूनच बप्पी लाहिरी हे संगीतकार होण्याचं ठरवलं होतं. तीन वर्षाचे असल्यापासून ते तबला वादन शिकले त्यांची प्रेरणा होते एसडी बर्मन. एसडी बर्मन यांची गाणी ऐकूण ते रियाज करायचे.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Bappi Lahiri : 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना'...अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली
MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha