मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज महत्वाची माहिती दिली आहे. काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केलेले अमोल काळे आणि आणखी काही लोकं पळून गेले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यातील अमोल काळे लंडनला पळून गेले आहेत तर बाकीचे दुबईला पळून गेले आहेत आता केंद्राच्या मदतीने त्यांना माघारी आणा, असं मलिक यांनी म्हणाले.
आयोगासमोर जाणार आहे आणि माझी बाजू मांडणार
मलिक यांनी म्हटलं आहे की, अँटिलिया बॉम्ब प्रकरणी एक सदस्यी समिती स्थापन करण्यात आली आहे. चांदिवाल आयोगाने 15 तारखेला नोटीस पाठवली होती. वाझे यांनी माझ्यावर आरोप केला आहे की मी त्यांची बदनामी करतं आहे. मी स्वतः आयोगासमोर जाणार आहे आणि माझी बाजू मांडणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
मलिक म्हणाले एनआयएच्या चार्जशीटच्या आधारे मीडिया ब्रिफिंग करतं आहे. परमवीर सिंहांना जाणिवपूर्वक वाचवण्यात येतं आहे.
हल्दर यांच्या विरोधात राष्ट्रपतीकडे पत्र लिहून हकालपट्टी करण्याची मागणी करणार
मलिक यांनी म्हटलं आहे की, आज जात पडताळणीसाठीची देखील तारीख आहे. तिथं देखील मी माझी बाजू मांडणार आहे. केंद्रीय मागास वर्गीय आयोगाने समीर वानखेडे यांना क्लीन चिट दिली परंतु ज्यांनी दिली ते हल्दर आहेत. ते काही लोकांच्या घरी देखील जाऊन आले होते. हल्दर कोणताही अधिकार नसताना निर्णय देत आहेत. कोणाची जात सिद्ध करण्याचे अधिकार अरुण हल्दर यांना नाही. त्यामुळे मी राष्ट्रपतीकडे या संदर्भात मी तक्रार करणार आहे. मी त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीकडे पत्र लिहून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहे, असं ते म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha