bollywood : बॉलिवूडमध्ये तुम्ही अनेक कुटुंबं पाहिली असतील, ज्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे जी आजही 51 व्या वर्षी काम करत आहे आणि एकेकाळी ती टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. सगळ्यात रंजक बाब म्हणजे तिची आई, मावशी, आजी आणि पंजी देखील  सिनेमात काम करत होत्या. चला तर मग या खास अभिनेत्रीची ओळख करून घेऊया.

Continues below advertisement


ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री काजोल आहे, जी आता 51 वर्षांची झाली आहे. काजोलने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अवघ्या 16 व्या वर्षी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि मग कधीच मागे वळून पाहिलं नाही.


काजोलने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, गुप्त आणि माय नेम इज खान यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत काम केलं. तिला सर्वाधिक वेळा शाहरुख खानसोबत स्क्रीनवर पाहिलं गेलं असून, त्यांच्या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.


काजोलच्या कुटुंबातील अनेक पिढ्या हिंदी सिनेमात कार्यरत राहिल्या आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की काजोलच्या पणजी रतन बाई आणि तिची आजी शोभना समर्थ या भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर तिची आई तनुजा आणि मावशी नूतन यांनीही अनेक संस्मरणीय चित्रपटांत अभिनय केला आहे.


अजय देवगनशी लग्न होण्यापूर्वी काजोल कार्तिक मेहताला डेट करत होती, ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत आहे. दोघांचं नंतर ब्रेकअप झालं होतं. एका मुलाखतीत काजोलने स्वतः ही गोष्ट उघड केली होती.


बॉलिवूडची सुपरहिट चित्रपटं गदर: एक प्रेम कथा आणि दिल से यामध्ये दिग्दर्शकांची पहिली पसंती काजोल होती, मात्र तिने हे चित्रपट नाकारले होते. जेव्हा तिला याबाबत विचारण्यात आलं, तेव्हा तिने सांगितलं की, “तो रोल माझ्यासाठी नव्हता, म्हणून मी नकार दिला.”


काजोलशी संबंधित एक रंजक किस्सा असा आहे की 1999 मध्ये अजय देवगनने Devgan Films नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली, तेव्हा काजोलने त्या कंपनीची अधिकृत वेबसाइट तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तिने तेव्हा सांगितलं होतं की, “मला संगणकाचं चांगलं ज्ञान आहे, किमान माझ्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा जास्त माहित आहे, म्हणून मी मदत केली.”


1990 च्या दशकात काजोलचं करिअर सर्वोच्च शिखरावर होतं. त्या काळात तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. Box Office India ने 1995 ते 1999 या पाच वर्षांत सलग तिला “टॉप अभिनेत्री”च्या यादीत स्थान दिलं होतं.


2010 मध्ये काजोल आणि शाहरुख खान माय नेम इज खान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमेरिकेत गेले होते. ते दोघंही NASDAQ (अमेरिकन स्टॉक एक्सचेंज) कडून आमंत्रित होणारे पहिले भारतीय कलाकार ठरले. त्यांनी NYSE American चा मार्केट बेल वाजवून अधिकृतरीत्या ट्रेडिंग डेची सुरुवात केली होती.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या


बेईमान सुपरस्टार, सनी देओलचा ब्लॉकबस्टर सिनेमा हिसकावून घेतला, ज्याने स्टार बनवलं त्याच दिग्दर्शकाशी वैर


VIDEO : बरसणारा पाऊस, चिंब भिजलेली नगमा अन् त्यात संजय दत्तचा अनावश्यक कुंफू-कराटे; कुणालाच लॉजिक समजेना