Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी हे  आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.


1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदार्पण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. 'डर्टी पिक्चर' या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या 'उ लाला' हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं. 2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. 


Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लेहरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेली 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं. 


बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांमधी गाणी संगीतबद्ध केली.







बप्पी यांनी 2014 साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. 


संबंधित बातम्या


Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित


Sandhya Mukherjee : प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांचं निधन ; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha