Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. तर 18 फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि नाट्य असणार आहे.
'बच्चन पांडे' सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षयचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या सिनेमात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"या पात्राच्या अनेक छटा आहेत. 'बच्चन पांडे' तुम्हाला घाबरवायला, हसवायला आणि रडवायला तयार आहे. फक्त तुम्ही प्रेमाचा वर्षाव करा".
'बच्चन पांडे' सिनेमा 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक एका गँगस्टरवर आधारित आहे. या सिनेमात कृती सेनन, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि प्रतिक बाबरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या