bollywood : सेलिब्रिटींना चाहते केवळ पडद्यावर पाहात असतात. मात्र, त्यांच्यासोबत वैयक्तिक कुठलाही संबंध नसला तरी सेलिब्रिटींच्या आयुष्यातील घडणाऱ्या घटना-अपघात यामुळे चाहते नेहमीच अस्वस्थ होतात. स्टार एखाद्या संकटात सापडला तर चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करतात. पडद्यावर ज्याला पाहिलं, तोच अचानक जग सोडून गेला, ही बातमी केवळ कुटुंबीयांनाच नाही तर चाहत्यांनाही हादरवून टाकते. असेच चार प्रसिद्ध कलाकार, ज्यांनी पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवली, पण अचानक त्यांचं जाणं सगळ्यांना रडवून गेलं. कोण होते हे स्टार्स, ज्यांचा दु:खद शेवट ऐकून तुम्हीही थरारून जाल.
आपण ज्या कलाकारांबाबत बोलत आहोत, त्यांना पडद्यावर पाहून प्रत्येक जण खुश व्हायचा. कोणीतरी पडद्यावर गुंडाच्या भूमिकेत तर कोणी नायकासोबत झळकलं. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की या प्रसिद्ध कलाकारांचा किती भीषण अपघात झाला आणि त्यातूनच त्यांचा अंत झाला. त्यांच्या कथा ऐकून डोळ्यात नकळत अश्रू येतील.
दहशतवाद्यांनी ठेवलेला बॉम्ब फुटला अन् इंद्र ठाकुर यांचा मृत्यू
सुरुवात करूया त्या नायकापासून ज्याने अतिशय वेगाने हिंदी सिनेमात प्रवेश केला आणि लगेचच लोकप्रिय झाला—तो म्हणजे इंद्र ठाकुर. नदिया के पार या चित्रपटात ज्यांना पाहिलं तेच इंद्र ठाकुर. हिंदी सिनेमातील पहिले खलनायक हीरालाल ठाकुर यांचा धाकटा मुलगा इंद्र यांचा जन्म 1950 साली झाला. लहानपणापासूनच अभ्यासात ते हुशार होते. त्याचबरोबर फॅशन डिझाइनिंगचीही आवड होती. त्यांनी कोर्स पूर्ण करून आपली कला एवढी गाजवली की त्यांचं नाव परदेशापर्यंत पोहोचलं. तरुण झाल्यावर इंद्र देखणे दिसू लागले आणि त्यांना मॉडेलिंगचे ऑफर येऊ लागले. थोड्याच दिवसांत ते देशातील नामवंत मॉडेल्समध्ये गणले जाऊ लागले. त्याच सुमारास राजश्री प्रॉडक्शन नवीन चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होतं. इंद्रवर निर्मात्यांची नजर पडली आणि 1982 मध्ये नदिया के पार चित्रपटासाठी त्यांची निवड झाली. यात त्यांनी सचिनच्या मोठ्या भावाची भूमिका केली. त्यांच्या अभिनयाने सुभाष घई एवढे प्रभावित झाले की पुढच्याच वर्षी म्हणजे 1983 मध्ये त्यांना हीरो मध्ये घेतलं. यानंतर चित्रपटांची रांग त्यांच्या दाराशी लागली. ते यशाच्या उंचीवर जात असतानाच एका भीषण दुर्घटनेने सर्वकाही संपवलं. 1985 मध्ये त्यांनी अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाइनिंग स्पर्धेत विजय मिळवला होता. बक्षीस घेऊन ते कॅनडाला फिरायला गेले आणि तिथून भारत परतत होते. 23 जून 1985 रोजी ते एअर इंडिया 182 या विमानाने लंडन–दिल्लीमार्गे मुंबईला येत होते. पण या विमानात दहशतवाद्यांनी ठेवलेला बॉम्ब फुटला. या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून सर्वत्र धक्का बसला.
महावीर शहा यांचा कारने धडक दिल्याने मृत्यू
महावीर शहा 80–90 च्या दशकात जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या चित्रपटात ते दिसायचे. कधी खलनायक, कधी त्याचा साथी, कधी डाकू तर कधी कठोर पोलिस. घाऱ्या डोळ्यांचा हा गुंड पडद्यावर इतका खतरनाक दिसायचा की प्रेक्षक चिडून जायचे. पण खऱ्या आयुष्यात ते शांत आणि गंभीर स्वभावाचे होते. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या महावीर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेच्या काळातच त्यांनी गुजराती थिएटरमध्ये काम सुरू केलं. नायक बनण्याचं स्वप्न होतं, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे खलनायकाच्या भूमिका त्यांना अधिक शोभल्या. 1977 मध्ये अवघ्या 17 व्या वर्षी त्यांना अब क्या होगा या चित्रपटात छोटा रोल मिळाला. खरी ओळख 1982 मध्ये आलेल्या गांधी चित्रपटात पोलीसाच्या भूमिकेतून झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. तेजाब, पुलिस पब्लिक, तिरंगा अशा चित्रपटांत त्यांनी काम केलं. पण त्यांचा शेवटही अत्यंत दुर्दैवी ठरला. महावीर शहा यांना कुटुंबासोबत फिरायला खूप आवडायचं. अमेरिकेच्या ट्रिपला पत्नी, मुले आणि मित्रांसह ते निघाले. 31 ऑगस्ट रोजी ते रस्त्याने शिकागोकडे जात होते. अचानक एका गाडीने त्यांच्या कारला धडक दिली. यातून ते वाचले, पण पत्नी आणि मुलांची काळजी वाटल्याने ते गाडीतून उतरून त्यांची विचारपूस करत होते. तेवढ्यात एका दुसऱ्या वेगवान गाडीने त्यांना चिरडलं. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 40 व्या वर्षी या फिल्मी खलनायकाचा इतका भीषण अंत होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
तिसरे कलाकार होते नरेंद्र नाथ. ते महान अभिनेते प्रेमनाथ आणि राजेंद्र नाथ यांचे धाकटे भाऊ. प्रेमनाथ–राजेंद्र नायक बनले, तर नरेन्द्र नाथ खलनायक म्हणून गाजले. मध्य प्रदेशातील या भावांनी अनेक चित्रपटांत काम केलं. नरेन्द्र नाथ यांना खरी ओळख मिळाली ती खोटे सिक्के या चित्रपटातून. ‘जग्गू दादा’च्या भूमिकेत त्यांनी इतकी छाप सोडली की त्यानंतर अनेक वर्षे ते मागे वळून पाहिलं नाही. काला सोना, हादसा, दीवानगी, हवेली, गेस्ट हाउस यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं. 1998 मध्ये महल हा त्यांचा चित्रपट रिलीज झाला. अनेक वर्षांनी ते आपल्या जबलपूरच्या घरी गेले होते. एखाद्या कामासाठी घराबाहेर पडले असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की त्यांची प्रकृती ढासळली. खाणं–पिणं आणि चालणं अवघड झालं. त्या जखमांमुळे आणि अशक्तपणामुळे शेवटी त्यांचा मृत्यू झाला.
तुम्ही अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटाची अभिनेत्री होती सौंदर्या. कर्नाटकमध्ये जन्मलेल्या सौंदर्या MBBS चे शिक्षण घेत होत्या. त्यांचे वडील के. एस. सत्यनारायण कन्नड चित्रपटसृष्टीतील लेखक आणि अभिनेते होते. त्यामुळे लहानपणापासूनच सौंदर्या या वातावरणाशी परिचित होत्या. वडिलांच्या इच्छेनुसार त्या डॉक्टर होणार होत्या; मात्र एका दिवशी वडिलांच्या मित्राने त्यांच्या घरी येऊन त्यांच्या आयुष्याला नवा वळण दिलं. ते ‘गंधर्व’ नावाचा चित्रपट बनवत होते आणि त्यात त्यांनी सौंदर्याला नायिकेची भूमिका दिली. चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट ठरला. पहिल्याच चित्रपटाने त्यांना स्टारडम मिळालं. दक्षिणेत धुमाकूळ घालणाऱ्या सौंदर्याने बॉलिवूडमध्येही पाऊल टाकलं. दक्षिणेतील एका मोठ्या दिग्दर्शकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट तयार केला आणि त्यात नायिकेची मुख्य भूमिका सौंदर्याला मिळाली. 1999 मध्ये हा सूर्यवंशम चित्रपट प्रदर्शित झाला. 2003 साली त्यांनी आपल्या बालपणीच्या मित्रा जी. एस. रघु यांच्यासोबत लग्न केलं. मात्र करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांचा अंत अतिशय भीषण ठरला. अवघ्या 31 वर्षांच्या सौंदर्याने जगाचा निरोप घेतला. 2004 मध्ये एका राजकीय सभेला जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात कोसळले. या अपघातात सौंदर्या, त्यांचा भाऊ आणि इतर दोन जणांचा मृत्यू झाला. या वेळी सौंदर्या गर्भवती होत्या. असं म्हटलं जातं की, सौंदर्याचा जन्म झाला तेव्हाच एका ज्योतिषाने त्यांचा अल्पायुषी मृत्यू होईल अशी भविष्यवाणी केली होती. त्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी हवन–पूजन आणि अनेक उपाय केले. मात्र नियतीसमोर हे सारे उपाय निष्फळ ठरले आणि तो दु:खद प्रसंग टाळता आला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या